दिवाळी (Diwali) म्हटलं की डोळ्यांसमोर येतो ते फराळ. चमचमीत फराळ कोणाला नाही आवडत. चिवडा, चकली, लाडू करंजी दिसताच, लोकं त्यावर तुटून पडतात. मुख्य म्हणजे चकली खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. फराळामध्ये चकलीच आधी संपते, त्यानंतर इतर पदार्थ. चकली करण्याचे अनेक प्रकार आहेत. भाजणी, तांदुळाची चकली आपण खाल्लीच असेल. पण कधी पोह्याची चकली खाऊन पाहिली आहे का?
पोह्याचा वापर कांदे पोहे, पोह्यांचा चिवडा तयार करण्यासाठी होतो. आपण याची चकली देखील तयार करू शकता. पोह्याची चकली झटपट, कमी मेहनत घेता तयार होते. यंदाच्या दिवाळीत आपल्याकडे भाजणीची चकली तयार करण्यासाठी वेळ नसेल तर, पोह्याची कुरकुरीत चकली नक्कीच करून पाहा(How to make Instant Poha Chakli Recipe, Diwali Recipe).
पोह्याची चकली करण्यासाठी लागणारं साहित्य
पोहे
भाजलेली चणा डाळ
तांदुळाचं पीठ
लाल तिखट
पांढरे तीळ
काळे तीळ
मीठ
चपात्या वातड-कडक होतात, फुगत नाही? चपातीच्या पीठात मिसळा 'हा' पदार्थ; मऊ होतील चपात्या
हिंग
बटर
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम, पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात एक कप पोहे आणि अर्धा कप भाजलेली चणा डाळ घालून भाजून घ्या. साहित्य भाजून घेतल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा. साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर तयार करा. मोठ्या बाऊलमध्ये चाळणी ठेवा. चाळणीत पोह्याची तयार पावडर ओतून चाळून घ्या.
तळलेल्या जाड पोह्यांचा करा कुरकुरीत खमंग चिवडा, चटकदार चिवडा-टिकेल महिनाभर फ्रेश
नंतर त्यात एक कप तांदुळाचं पीठ, एक चमचा लाल तिखट, एक चमचा पांढरे आणि काळे तीळ, चवीनुसार मीठ, चिमुटभर हिंग आणि एक चमचा बटर घालून मिक्स करा. नंतर त्यात गरजेनुसार कोमट पाणी घालून साहित्य एकजीव करा. ज्याप्रमाणे आपण चकली तयार करण्यासाठी पीठ मळतो, त्याच प्रमाणे पीठ मळायचे आहे. कणिक मळून झाल्यानंतर चकलीचा साचा घ्या, त्याला आतून तेलाने ग्रीस करा. त्यात कणिक भरून चकली पाडून घ्या, चकलीचे सुरूवातीचे आणि शेवटचे टोक दाबून घ्या. जेणेकरून चकली तेलात फुटणार नाही.
दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चकली सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे पोह्यांची कुरकुरीत खमंग चकली खाण्यासाठी रेडी.