Lokmat Sakhi >Food > डाळ-तांदूळ न भिजवता करा स्पॉन्जी- जाळीदार डोसा; वाटीभर पोह्याचे होतील १० ते १५ डोसे, इन्स्टंट रेसिपी

डाळ-तांदूळ न भिजवता करा स्पॉन्जी- जाळीदार डोसा; वाटीभर पोह्याचे होतील १० ते १५ डोसे, इन्स्टंट रेसिपी

How to Make Instant Poha Dosa (Instant Dosa Kasa Karaycha) : अगदी कमीत कमी वेळात डोसा बनून तयार होईल. पोहे सर्वांच्याच स्वयंपाकघरात असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:59 AM2024-01-05T10:59:21+5:302024-01-05T15:10:49+5:30

How to Make Instant Poha Dosa (Instant Dosa Kasa Karaycha) : अगदी कमीत कमी वेळात डोसा बनून तयार होईल. पोहे सर्वांच्याच स्वयंपाकघरात असतात.

How to Make Instant Poha Dosa : Instant Dosa Recipe Make Dosa in Just 10 Mins at Home | डाळ-तांदूळ न भिजवता करा स्पॉन्जी- जाळीदार डोसा; वाटीभर पोह्याचे होतील १० ते १५ डोसे, इन्स्टंट रेसिपी

डाळ-तांदूळ न भिजवता करा स्पॉन्जी- जाळीदार डोसा; वाटीभर पोह्याचे होतील १० ते १५ डोसे, इन्स्टंट रेसिपी

सकाळी नाश्त्याला (Breakfast) पटकन काहीतरी करायचं म्हटलं की ऐनवेळी कोणत्या रेसिपीज ट्राय कराव्यात ते सुचत नाही. नाश्त्याला तुम्ही इंस्टंट डोसा बनवू शकता. (Home made Dosa) डोसा करायचं म्हणलं की दळणं, आंबवणं सगळं काही करावं लागतं. (How to Make Dosa at Home) डाळ-तांदूळ न भिजवता, न दळता सोप्या पद्धतीने डोसा कसा करायचा ते पाहूया. (How to make Dosa Just in 10 mins) हा डोसा करण्यासाठी फार साहित्य लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात डोसा बनून तयार होईल. पोहे सर्वांच्याच स्वयंपाकघरात असतात. याच पोह्यांचा वापर करून तुम्ही इंस्टंट डोसा करू शकता.  (How to Make Poha Dosa)

१० मिनिटांत होणारा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य (Instant Poha Dosa Recipe)

1) पोहे- १ वाटी

2) रवा- १ वाटी

3) दही- १ वाटी

4) पाणी- १ वाटी

5) सोडा- अर्धा चमचा

6) तेल- गरजेनुसार

7) मीठ- चवीनुसार

इंस्टंट डोसा करण्याची सोपी कृती (How to Make Poha Dosa)

1) सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात वाटीभर पोटे, वाटीभर रवा घालून बारीक पेस्ट बनवून  घ्या. यात वाटीभर दही, वाटीभर पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण एकत्र होईपर्यंत एकाच दिशेने हलवत राहा. 

चपात्या कडक होतात-धड फुगत नाही? ५ टिप्स, चपात्या फुगतील भरपूर-होतील मऊसूत

2) तयार डोशाचे मिश्रण १० ते १५ मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्या. १५ मिनिटांनी झाकण उघडून यात चवीनुसार मीठ घाला. मीठ घातल्यानंतर पुन्हा चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात सोडा आणि पाणी घालून पुन्हा एकजीव करून घ्या. 

१ जुडी मेथी अन् कपभर गव्हाच्या पीठाची करा कुरकुरीत मेथी पुरी; थंडीत खा खमंग पुरी, सोपी रेसिपी

3) नॉन स्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात डोश्याचे पीठ घाला. पीठ घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने गोलाकार पसरवून घ्या. डोश्याला व्यवस्थित जाळीआल्यानंतर  पलटून दुसऱ्या बाजूनेही डोसा भाजून घ्या. तयार आहे गरमागरम इस्टंट  डोसा. 

4) हा डोसा तुम्ही बटाट्याची भाजी, चटणी किवा सॉसबरोबर खाऊ शकता. हिवाळ्यात पेरूच्या चटणीबरोबरही तुम्ही या डोशाचा आस्वाद घेऊ शकता.

Web Title: How to Make Instant Poha Dosa : Instant Dosa Recipe Make Dosa in Just 10 Mins at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.