Join us  

२ कप दूध-२ ब्रेड स्लाईज, गोड खाण्याची इच्छा झाली तर, करा गोड इन्स्टंट रबडी, करायला सोपी आणि चव जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 10:57 AM

How to make Instant Rabri with Milk : दूध न आटवता फक्त ५ मिनिटात इन्स्टंट रबडी करण्याची सोपी कृती

थंडीचे दिवस सुरु झाल्यानंतर खवय्ये वर्गाला विविध पदार्थ खाण्याची चटक लागते. गोड, तिखट, मसालेदार पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. गोड पदार्थांमध्ये खीर, शिरा, रबडी (Rabri) हमखास केली जाते. या दिवसात गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण गोड पदार्थ करण्यात खूप वेळ जातो. गोड पदार्थांमध्ये (Sweet Dish) रबडी आवडीने खाल्ली जाते. पण घरी हलवाईस्टाईल रबडी तयार होत नाही. बरेच जण रबडी खाण्यासाठी मिठाईच्या दुकानात जातात.

दुकानात जाऊन रबडीचा आस्वाद घेतात. पण आपल्याला घरीच हलवाईस्टाईल रबडी करायची असेल तर, ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा. रबडी तयार करायला वेळ लागतो म्हणून काही लोकं घरी रबडी तयार करत नाही (Cooking Tips). पण आता रबडी ५ मिनिटात तयार होईल, ते कसे पाहूयात(How to make Instant Rabri with Milk).

इन्स्टंट रबडी करण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

ब्रेडक्रम्ब्स

साखर

इडलीसाठी डाळ तांदूळ भिजवताना घाला २ पांढऱ्याशुभ्र गोष्टी, उडपीस्टाईल परफेक्ट इडली करा घरी

वेलची पूड

चारोळी

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये २ कप दूध घालून गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवा. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात २ स्लाईज ब्रेडचे घालून ब्रेडक्रम्ब्स तयार करा. तयार ब्रेडक्रम्ब्स दुधात घालून चमच्याने सतत ढवळत राहा. नंतर त्यात कपभर साखर, अर्धा चमचा वेलची पावडर, चमचाभर चारोळी घालून मिक्स करा. आपण त्यात आवडीनुसार ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता.

२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त

दूध घट्टसर झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार रबडी एका बाऊलमध्ये काढून डिश सर्व्ह करा. तयार रबडी आपण फ्रिजकमध्ये देखील सेट करण्यासाठी ठेऊ शकता. थंड झालेली रबडी देखील खायला चविष्ट लागते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स