Join us

१ वाटी रव्याचे करा १० मिनिटांत गोल-गोल फुललेले अप्पे; झटपट करा पौष्टिक नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:20 IST

How To Make Instant Rava Appe : रव्याचे अप्पे १५ मिनिटांत बनून तयार होतील.

रव्याचे अप्पे (Rava Appe) हा उत्तम पदार्थ आहे. जो नाश्त्याला खाल्ला जातो. दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला हलका फुलका नाश्ता करायचा असेल तर तुम्ही रव्याचे अप्पे खाऊ शकता. रव्याचे अप्पे पचायलाही हलके असतात. हे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं (Rava Appe Recipe). जर तुम्हाला रव्याचे अप्पे बनवायचे असतील तर कमी मेहनतीत तुम्ही सोप्या पद्धतीनं अप्पे बनवू शकता.  रव्याचे अप्पे १५ मिनिटांत बनून तयार होतील. सकाळच्या व्यस्त जीवनशैलीत तुम्हाला रव्याचे अप्पे हा उत्तम पर्याय आहे. (How To Make Instant Rava Appe) 

रव्याचे अप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

१) रवा - १ कप

२) दही- १ कप

३) पाणी- अर्धा कप

४) नारळाचा  किस - अर्धा कप

५) बारीक चिरलेली मिरची - १ ते दीड

६) बारीक केलेलं आलं - १ इंच

७) जीरं- अर्धा चमचा

८) हिंग- अर्धा चमचा

९) मीठ -चवीनुसार

रव्याचे अप्पे बनवण्याची योग्य पद्धत (Rava Appe Making Tips) 

1) रवा एका भांड्यात काढून घ्या. त्यात दही आणि पाणी मिसळून व्यवस्थित एकजीव करा.  १५ ते २० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की..

2) भिजवलेल्या रव्यात नारळाचा कि, हिरवी मिरची, आलं, जीरं, हिंग आणि मीठा घालून व्यवस्थित एकजीव करा. मिश्रण जास्त घट्ट नसेल याची काळजी घ्या. इडली, डोश्याच्या पिठाप्रमाणे या बॅटरची कन्सिटेंसी असावी.

 

3) अप्पे करण्यासाठी अप्पे पात्राला तेल लावून गरम करण्यासाठी ठेवा. हे पात्र गरम झाल्यानंतर त्यात एका छोट्या चमच्याच्या मदतीने अप्पे घाला.

छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात? ताकात 'हा' पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल

4) मंद आचेवर  १० ते १५ मिनिटांसाठी अप्पे शिजवून घ्या. दोन्ही बाजूंनी  व्यवस्थित शिजवा. गरमागरम अप्पे नारळाची चटणी किंवा सांबारबरोबर सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स