मार्च महिना मध्यावर आला आहे. त्यामुळे सध्या बाजारात हिरव्यागार कैऱ्या मोठ्या प्रमाणात विकायला आल्या आहेत. हिरवीगार कैरी पाहिली की तोंडाला अगदी पाणी सुटतंच. कारण या दिवसांत तोंडी लावायला कैरी किंवा कैरीचे काही पदार्थ असतील, तर जेवणाची मजा नक्कीच आणखी वाढते. म्हणूनच आता जेवणाची रंगत खुलविणारं आणि तुम्हाला २ घास जास्तीचे जेवायला लावणारं कैरीचं इन्स्टंट लोणचं कसं करायचं ते पाहूया ( raw mango pickle recipe).. रेसिपी अगदी आहे. (aam ka achar recipe in just 5 minutes)
कैरीचं इन्स्टंट लोणचं करण्याची रेसिपी
साहित्य
१ मध्यम आकाराची कैरी
१ टीस्पून लाल तिखट
१ टिस्पून हळद
१ टीस्पून मेथी दाणे
हॉलमध्ये 'कॉर्नर पीस' म्हणून ठेवता येण्यासारखी ५ सुंदर रोपं
अर्धा टेबलस्पून तेल
चिमूटभर हिंग
२ टीस्पून मोहरी
१ टीस्पून साखर किंवा गूळ
कृती
१. सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवनू घ्या आणि तिच्या देठाकडचा भाग काढून तिच्या बारीक फोडी करून घ्या.
२. बारीक चिरलेली कैरी एका भांड्यात घ्या. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाका.
फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत
३. मेथी दाणे मंद आचेवर भाजून घ्या आणि थंड झाल्यावर खलबत्त्यात टाकून त्याची पावडर करून घ्या. ही मेथी दाण्यांची पावडरही लोणच्यामध्ये घाला.
४. आता या लोणच्यावर मोहरी, हिंग घालून केलेली खमंग फोडणी घाला.
५. फोडणी घातल्यानंतर सगळ्यात शेवटी साखर किंवा गूळ घाला आणि सगळं मिश्रण हलवून घ्या. चटपटीत लोणचं झालं तयार.
हिरव्यागार कैरीचा आंबट- गोड, चटपटीत मेथांबा! जेवणात येईल रंगत- बघा एकदम सोपी रेसिपी
ही पद्धतही पाहून घ्या
इन्स्टंट लोणचं करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे बारीक चिरलेल्या फोडींवर बाजारात रेडिमेड मिळणारा लोणचं मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ घालून फोडणी द्यायची. या पद्धतीने केलेलं लोणचंही चवदार होतं.