उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांत हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे पांढऱ्याशुभ्र कुरडया. या कुरडया खायला आणि दिसायला जितक्या चविष्ट आणि सुंदर (Instant Rice Kurdai) दिसतात, तितक्याच त्या तयार (How To Make Instant Rice Kurdai) करण्यासाठी खूप मोठा घाट घालावा लागतो. खरंतर, पारंपरिक पद्धतीने कुरडया करायच्या म्हटलं तर गहू भिजत घालून, त्याचा चीक काढावा लागतो मग हा चीक शिजवून त्याच्या कुरडया (Chawal ke ate ki kurdai) केल्या जातात. परंतु ही प्रक्रिया फार मोठी, किचकट आणि वेळखाऊ असते. याचबरोबर, या कुरडया करायचे म्हणजे एकट्यादुकट्याचे काम नाही यासाठी मदतीचा हात लागतोच(How To Make Idli Maker Rice Kurdai At Home).
परंतु बदलत्या काळानुसार, आजकाल कुरडया करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो, तसेच इतके कष्ट घेऊन ही एवढी मेहेनत करण्याची तयारी नसते. अशावेळी आपण अगदी झटपट तयार होण्याऱ्या आणि वर्षभर टिकणाऱ्या तांदुळाच्या पिठाच्या इन्स्टंट कुरडया घरीच तयार करु शकतो. यातही जर तुमच्याकडे इडली पात्र आणि मायक्रोव्हेव असेल तर मग कुरडया करणं आणखीनच सोपं होईल. इडली पात्र आणि मायक्रोव्हेव वापरुन इन्स्टंट तांदुळाच्या पिठाच्या कुरडया करण्याची झटपट रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. तांदुळाचे पीठ - २ कप २. पाणी - ३ कप ३. बेकिंग सोडा - १/४ टेबलस्पून ४. पापड खार - १ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार ६. तेल - २ टेबलस्पून
वाफाळत्या भातासोबत आंबट - गोड कैरीची कढी ! उन्हाळ्यातील स्पेशल मेन्यू - मन होईल तृप्त असा बेत...
दुधाला विरजण म्हणून लावा ‘हे’ ३ पदार्थ, कुणाकडे विरजण मागायची गरज नाही! परफेक्ट दह्यासाठी उपयुक्त...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका मोठ्या भांड्यात तांदुळाचे पीठ घ्यावे. २. आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळून घ्यावे. पाण्याला हलकी उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, बेकिंग सोडा व पापड खार घालावे. त्यानंतर चमच्याने हलवून मीठ पाण्यांत विरघळवून घ्यावे. ३. आता तांदुळाच्या पिठात हे गरम पाणी ओतून पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्यावे. गरजेनुसार हळूहळू पाणी ओतून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे.
४. मळून घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून साच्यात घालावा. ५. इडली वाफवण्याचे भांडं घेऊन त्याला बोटाने थोडे तेल लावून घ्यावे. मग या तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात साच्याच्या मदतीने कुरडया पाडून घ्याव्यात. ६. आता इडल्या वाफवतो त्याप्रमाणेच इडली पात्रात पाणी ठेवून कुरडया वाफवून घ्याव्यात. ७. जर तुमच्याकडे मायक्रोव्हेव असेल तर तुम्ही सिलिकॉन मटेरियलच्या इडली पात्रात कुरडया पाडून ते भांडं मायक्रोव्हेव मध्ये ठेवून १०मिनिटांत कुरडया वाफवून घेऊ शकता.
८. वाफवून घेतलेल्या कुरडया एक एक काढून प्लॅस्टिकच्या कागदाला तेल लावून त्यावर ३ ते ४ दिवस ठेवून अगदी व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. ९. कुरडया संपूर्णपणे वाळल्यानंतर एका डब्यांत भरून स्टोअर करून ठेवाव्यात.
अशाप्रकारे आपण फार मोठा घाट न घालता देखील अगदी इन्स्टंट वर्षभर टिकणाऱ्या आणि चौपट फुलणाऱ्या कुरडया झटपट करु शकतो.