इडली, डोसा हे पदार्थ आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरी बहुतेकवेळा नाश्त्याला बनवले जातात. इडली, डोसा हे जरी दाक्षिणात्य पदार्थ असले तरीही ते सर्वत्र भारतात अतिशय आवडीने खाल्ले जातात. डोसा तांदूळ व डाळीचे पीठ आंबवून तयार केला जातो. रवा डोसा,मसाला डोसा, मुगाचे डोसे असे याचे विविध प्रकार असतात. शक्यतो डोसा आपण बटाट्याची भाजी, सांबार आणि चटणीबरोबर खातो. डोसा तयार करायचा म्हटलं की आपल्याला त्यासाठी डाळ, तांदूळ भिजत घालून त्याचे पीठ तयार करावे लागते. हे पीठ आपल्याला आंबवून घ्यावे लागते. डोशाचे पीठ तयार करणेच काहींना नीट जमत नाही. डाळ, तांदुळाचे प्रमाण बिघडले की डोसा हवा तसा खरपूस बनत नाही. डोसा बनवायचा म्हटलं की त्याचे पीठ तयार करण्यापासून जय्यत तयारी करावी लागते.
डोसा बॅटर व्यवस्थित आंबून तयार झाले तर डोसे चवीला छान लागतात. याउलट डोसा बॅटर बनवताना काही चुका झाल्या की डोशांच सगळं गणितचं फसत. अशावेळी काही गृहिणी बाहेरुन रेडिमेड बॅटर आणून त्याचे डोसे बनवतात. तसेच काहीवेळा कामाच्या गडबडीत आपल्याला डोशाचे बॅटर बनवायला तितकासा वेळ नसतो. अशावेळी आपण नाश्त्याला गव्हाच्या पिठाचे झटपट तयार होणारे डोसे लगेच बनवू शकतो. गव्हाच्या पिठाचे डोसे बनवण्यासाठी आपल्या डाळ व तांदूळ भिजत घालण्याची गरज भासत नाही. तसेच ६ ते ७ तास पीठ आंबवत ठेवण्याची गरज नसते. घाईच्या वेळी आपण असे झटपट होणारे डोसे नाश्त्याला बनवू शकतो(How To Make Instant Wheat Flour Dosa At Home : Homemade Recipe).
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - १ कप २. लसूण पाकळ्या - ५ ते ६ (बारीक किसून घेतलेल्या)३. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून ४. तेल - ३ ते ४ टेबलस्पून ५. कोथिंबीर - १ ते २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)६. मीठ - चवीनुसार ७. पाणी - २ कप
दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...
डोसा करताना तुम्हीही हमखास करत असाल ५ चुका, शेफ संजीव कपूर सांगतात डोसा सिक्रेट...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्यावे. २. या गव्हाच्या पिठात बारीक किसून घेतलेल्या लसूण पाकळ्या, चिली फ्लेक्स, चमचाभर तेल किंवा तूप , बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. ३. हे सगळे जिन्नस एकजीव करुन चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे.
आंबा आणि साखर, दोनच गोष्टी वापरून करा परफेक्ट आंब्याचा जॅम, वर्षभर टिकेल...
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत...
४. या डोशाच्या पिठाची कंन्सिस्टंसी जास्त पातळ किंवा घट्ट ठेवू नये. डोशाचे पीठ मध्यम कंन्सिस्टंसीचे करुन घ्यावे. ५. हे डोशाचे बॅटर तयार करताना त्यात पिठाच्या गुठळ्या राहू नयेत याची काळजी घ्यावी. ६. आता एका पॅनमध्ये तेल सोडून हे डोशाचे तयार बॅटर गोलाकार डोशाच्या आकारात सोडावे. ७. त्यानंतर हा डोसा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा.
गव्हाच्या पिठाचा डोसा खाण्यासाठी तयार आहे. हा डोसा हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करावा.