ऊन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकालाच दही खाण्याची इच्छा होते. (Cooking Hacks & Tips) या वातावरणात दही खाल्ल्याने शरीरासोबतच पोटालाही आराम मिळतो. खासकरून ऊन्हाळ्याच्या दिवसांत लोक आपल्या रोजच्या रूटीनमध्ये कढी, ताक, दही या पदार्थांचा समावेश करतात. (Instant Dahi Making Tips)ऊन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक घरांमध्ये दही लावलं जातं. पण विरजण नसेल तर पटकन दही कसं लावायचं असा प्रश्न पडतो. दही लावल्यानंतर खूपच आंबट होते. दही लावताना तुम्ही काही खास उपाय केले तर दही आंबट होणार नाही. (How To Make Instant Yogurt)
दही लावण्यासाठी रात्रीची वेळ उत्तम मानली जाते. कारण रात्रीच्या वेळी तापमान कमी असते. ज्यामुळे दही सहज लावण्यास मदत होते आणि जास्त आंबटही होत नाही. जर तुम्ही दिवसा दही लावत असाल तर तापमान जास्त असते. ज्यामुळे दह्याची चव बिघडू शकते.
५ मिनिटांत भरपूर लसूण सोलण्याच्या ५ ट्रिक्स, लसूण सोलण्याचं किचकट काम होईल सोप
दुधात साखर मिसळून दही बनवा
दही आंबट होऊ नये यासाठी आधी तयारी करणं गरजेचं आहे. दूधात साखर मिसळल्यानंतर तुम्ही यात विरजण घालू शकता. दूध उकळवताना दूधात थोडी साखर घालून एकत्र करा. नंतर विरजण घालून एखाद्या थंड जागेवर स्टोअर करा. हा उपाय केल्यानं दही जास्त आंबट होणार नाही.
दही लावताना एका गोष्टीची काळजी घ्या की दुधाचे तापमान जास्त नसेल, ना दूध जास्त थंड असावं. तुम्ही स्पर्श करू शकाल इतकंच गरम असावं दूध असावं. दूधात विरजण मिसळण्याआधी व्यवस्थित उकळवून घ्या ज्यामुळे दही आंबट होणार नाही. दही लावण्याच्या प्रयत्नात लोक जास्त विरजण घालतात पण हे टाळायला हवं. ज्यामुळे दही आंबट होते. फ्रेश दह्याचा वापर करा.
इंस्टंट दही लावण्याची ट्रिक
दूध उकळून कोमट होईपर्यंत थंड करून घ्या. नंतर त्यात देठासकट हिरवी मिरची किंवा लाल मिरची घाला. सुक्या आणि गरम कापडाने झाकून ठेवा. कमीत कमी वेळात दही तयार झालेलं असेल. दुसरी पद्धत अशी की एका भांड्यात थोडं गरम पाणी घ्या. त्या दह्यात भांडं ठेवून बंद करा. 2 तासांसाठी अशा कोपऱ्यात ठेवा जिथे तापमान गरम राहील. 2 तासांनी चेक करा दही तयार झालेलं असेल.