Lokmat Sakhi >Food > तोंडाला चव नाहीये? ५ मिनिटांत करा लसणाची झणझणीत, चविष्ट चटणी; जेवणाची वाढेल रंगत

तोंडाला चव नाहीये? ५ मिनिटांत करा लसणाची झणझणीत, चविष्ट चटणी; जेवणाची वाढेल रंगत

How to Make Instatnt Garlic Chutney : भात असो किंवा चपाती लसणाची चटणी प्रत्येक पदार्थाबरोबर खायला उत्तम लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 02:11 PM2023-05-26T14:11:01+5:302023-05-26T14:11:49+5:30

How to Make Instatnt Garlic Chutney : भात असो किंवा चपाती लसणाची चटणी प्रत्येक पदार्थाबरोबर खायला उत्तम लागते.

How to Make Instatnt Garlic Chutney : Cooking Hacks Instatnt Garlic Chutney Recipe | तोंडाला चव नाहीये? ५ मिनिटांत करा लसणाची झणझणीत, चविष्ट चटणी; जेवणाची वाढेल रंगत

तोंडाला चव नाहीये? ५ मिनिटांत करा लसणाची झणझणीत, चविष्ट चटणी; जेवणाची वाढेल रंगत

नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्याच्या दिवसात आधीच जेवण कमी जातं. घामामुळे काहीही खाण्याची इच्छा होत नाही. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तोंडी लावणीसाठी झणझणीत, चवदार लसणाची चटणी खाऊन तुम्ही जेवणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. (How to Make Instatnt Garlic Chutney) 

यामुळे साध्या जेवणाचीही रंगत वाढते. भात असो किंवा चपाती लसणाची चटणी प्रत्येक पदार्थाबरोबर खायला उत्तम लागते. लसणाची चटणी बनण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं  लागणार नाही. अगदी घरच्याघरी उपलब्ध असलेलं साहित्य वापरून उत्तम गावरान चवीची चटणी तयार होईल.

लसणाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी लसूण आणि मिरच्या भाजून घ्या. यामध्ये  भिजवलेली लाल मिरची घाला, जीरं,मीठ घाला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्या आण पुन्हा एका पसरट भांड्यात काढा. या चटणीवरवरून लिंबू पिळा. भात किंवा भाजीबरोबर, ब्रेडबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता. 

टोमॅटो घालून लसणाची चटणी कशी बनवायची?

मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या, टोमॅटो, लाल तिखट, जिरे आणि चवीनुसार मीठ टाका. आता सर्व गोष्टी बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा. टोमॅटो लसूण चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही पकोडे, परांठे आणि डाळ भातासोबत खाऊ शकता.

राजस्थानी लसूण चटणी 

राजस्थानी लसूण चटणी बनवण्यासाठी प्रथम ब्लेंडरमध्ये लसूण पाकळ्या,ॉ लाल तिखट, तिखट, जिरे, मीठ आणि पाणी घाला.आता सर्वकाही चांगले बारीक करा. गुळगुळीत पेस्ट बनवा. यानंतर, तेल गरम करण्यासाठी पॅनमध्ये ठेवा. नंतर गरम तेलात मोहरी टाका. बिया तडतडायला लागल्यावर त्यात चटणी घाला आणि वर थोडे पाणी घाला. आता मध्यम आचेवर शिजू द्या.  चटणी वरून तेल वेगळे होऊन घट्ट होईपर्यंत शिजवा. चटणी  ढवळत राहावी म्हणजे ती जळणार नाही. राजस्थानी स्टाईल लसूण चटणी तयार आहे. 

Web Title: How to Make Instatnt Garlic Chutney : Cooking Hacks Instatnt Garlic Chutney Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.