Lokmat Sakhi >Food > गुळाचा चहा फाटतो, नासल्यासारखा होतो? पाहा गुळाचा चहा करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत, साखरेपेक्षा गूळच बरा...

गुळाचा चहा फाटतो, नासल्यासारखा होतो? पाहा गुळाचा चहा करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत, साखरेपेक्षा गूळच बरा...

How to Make Jaggery Tea : हिवाळ्यात प्यायलाच हवा गुळाचा चहा, आता चहा नासण्याची भीतीच उरणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2023 11:54 AM2023-11-19T11:54:29+5:302023-11-19T11:55:16+5:30

How to Make Jaggery Tea : हिवाळ्यात प्यायलाच हवा गुळाचा चहा, आता चहा नासण्याची भीतीच उरणार नाही..

How to Make Jaggery Tea? | गुळाचा चहा फाटतो, नासल्यासारखा होतो? पाहा गुळाचा चहा करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत, साखरेपेक्षा गूळच बरा...

गुळाचा चहा फाटतो, नासल्यासारखा होतो? पाहा गुळाचा चहा करण्याची सोपी-परफेक्ट पद्धत, साखरेपेक्षा गूळच बरा...

भारतात असे कमी लोकं सापडतील ज्यांना चहा (Tea) आवडत नसेल. चहाचा चाहतावर्ग फार मोठा आहे. अनेकांची दिवसाची सुरुवात चहानेच होते. दूध, साखर, चहापत्ती, पाण्याचा वापर करून चहा केला जातो. अनेक जण चहामध्ये चहाचा मसाला किंवा आलं घालतात. पण अनेक फिटनेस फ्रिक लोकं साखरेचा चहा पिण्यास टाळतात. शिवाय डायबिटिजग्रस्त रुग्ण देखील साखरेचा चहा पीत नाही. जर आपल्याला चवीला गोड पण साखरेचा वापर न करता चहा तयार करायचा असेल तर, गुळाचा चहा (Jaggery Tea) तयार करून पाहा.

गुळामध्ये साखरेपेक्षा (Sugar) जास्त पोषकमुल्य असतात. प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ६, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारख्या कित्येक पोषक घटक गुळामध्ये आढळतात. पण गुळाचा चहा तयार करताना नासतो, ज्यामुळे संपूर्ण चहा खराब होतो. जर गुळाचा चहा (Cooking Tips) खराब होऊ नये असे वाटत असेल तर, स्टेप बाय स्टेप या रेसिपीला फॉलो करा. काही मिनिटात परफेक्ट गुळाचा चहा तयार होईल(How to Make Jaggery Tea).

गुळाचा चहा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

चहापत्ती

गुळ

फोडणीचा भात कशाला, उरलेल्या भाताचे करा क्रिस्पी मंचुरियन, चव अशी की लोकं आवडीने खातील

वेलची

दूध

पाणी

कृती

साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

सर्वप्रथम, गुळ किसून घ्या. मग दूध तापवण्यासाठी ठेवा. चहाच्या भांड्यात २ कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात २ ठेचून घेतलेली वेलची, किसून घेतलेलं आलं, २ चमचा चहा पावडर घालून मिक्स करा. चहाला उकळी आल्यानंतर त्यात एक कप गरम दूध घाला. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व त्यात आपल्या चवीप्रमाणे किसलेसं गुळ घालून मिक्स करा. त्यानंतर लो फ्लेमवर गॅस चालू करा. चहाला हलकी उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. चहाच्या गाळणीने चहा एका कपमध्ये गाळून घ्या. अशा प्रकारे गुळाचा चहा पिण्यासाठी रेडी. 

Web Title: How to Make Jaggery Tea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.