Lokmat Sakhi >Food > गुळाचा चहा करण्याची परफेक्ट पद्धत, उन्हाळ्यातही चहा नासण्याचे टेन्शन नाही, चहा होईल फक्कड

गुळाचा चहा करण्याची परफेक्ट पद्धत, उन्हाळ्यातही चहा नासण्याचे टेन्शन नाही, चहा होईल फक्कड

How to make jaggery tea recipe, Healthy Gulacha Chaha गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत, पाहा रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 12:30 PM2023-03-15T12:30:44+5:302023-03-15T12:31:35+5:30

How to make jaggery tea recipe, Healthy Gulacha Chaha गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत, पाहा रेसिपी..

How to make jaggery tea recipe, Healthy Gulacha Chaha | गुळाचा चहा करण्याची परफेक्ट पद्धत, उन्हाळ्यातही चहा नासण्याचे टेन्शन नाही, चहा होईल फक्कड

गुळाचा चहा करण्याची परफेक्ट पद्धत, उन्हाळ्यातही चहा नासण्याचे टेन्शन नाही, चहा होईल फक्कड

भारतात असे कमी लोकं सापडतील ज्यांना चहा आवडत नसेल. चहाप्रेमींना कुठेही, केव्हाही, कधीही चहाची तलब लागते. चहापत्ती, साखर, चहा मसाल्यांचा वापर करून फक्कड चहा तयार होतो. पण फिटनेसचा विचार केल्यास साखरेचा चहा पिण्यावर अनेक मर्यादा येतात.  मधुमेहग्रस्त रुग्णांना साखर वर्ज्य असते. अशा परिस्थितीत काही लोकं बिनासाखरेचा चहा पितात. साखरेचा चहा नको असेल तर काही प्रमाणात गुळाचा चहा घेण्यास काहीच हरकत नाही.

गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषकमुल्य असतात. गुळाचा चहा प्यायल्यानं पचन चांगले सुधारते. यामुळे छातीत जळजळ होणं, गॅस तयार होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही. गुळाचा चहा प्यायल्यानं हिमोग्लोबिन वाढते, ज्यामुळं रक्ताची कमतरता दूर होते. आपण जर पहिल्यांदाच गुळाचा चहा बनवत असाल तर स्टेप बाय स्टेप फॉलो करून हा चहा बनवा. कारण बऱ्याचदा दूध खराब होते. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेऊन हा गुळाचा चहा बनवा(Jaggery tea recipe, Healthy Gulacha Chaha).

गुळाचा चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१ कप पाणी

१ टेबलस्पून चहा पावडर

१/४ टेबलस्पून वेलची पावडर

एक चिमूटभर जायफळ पावडर

गरम दूध

आंब्याची पाने खाल्ल्याने शुगर नियंत्रणात येते हे खरे की खोटे?

गुळाचा चहा तयार करण्याची कृती

स्टेप १ - चहाच्या भांड्यात सर्वप्रथम, पाणी घ्या. त्यात चहा पावडर घाला व गॅस चालू करा.

स्टेप २ - चहा पावडर आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर, दूध घाला, गॅस मध्यम आचेवर ठेवा.

स्टेप ३ - चहा चांगला उकळला की गॅस बंद करा आणि त्यात गुळ घाला. लक्षात ठेवा गुळ किसून घालायचे आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे त्यात गुळ मिक्स करू शकता. सेंद्रिय गुळ वापरण्याचा प्रयत्न करा. केमिकल गुळ टाळा. कारण त्यात सोडा असतो ज्यामुळे दूध खराब होण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून ३ टिप्स, ऐनवेळी दूध नासण्याची भीतीच उरणार नाही..

स्टेप ४ - गॅस पुन्हा चालू करा आणि चहा सुमारे एक मिनिट उकळवत ठेवा.

स्टेप ५ - गुळ घातल्यानंतर चहा मिक्स करू नका किंवा ढवळू नका. ते जसे आहे तसे उकळवा.

स्टेप ६ - गॅस बंद करा आणि चहा कपात गाळून घ्या. अशा प्रकारे गुळाचा चहा रेडी.

Web Title: How to make jaggery tea recipe, Healthy Gulacha Chaha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.