थंडीच्या दिवसांत (Winter Season) गुळाच्या चहाचे सेवन तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. काही लोक नाश्त्याच्या पदार्थात गूळ खातात तर काहीजण गोड खाल्ल्यानंतर गुळाचे सेवन करातत. हिवाळ्याच्या वातावरणात गुळाचा चहा मोठ्या प्रमाणात प्यायला जातो. गुळाचा चहा फाटतो अशी तक्रार बऱ्याचजणांची असते. काही सोपे उपाय करून तुम्ही चुटकीसरशी गुळाचा चहा बनवू शकता. (How To Make Jaggery Tea)
गुळाचा चहा हेल्दी असण्याबरोबरच अनेकांचा फेव्हरेटही असतो. पण चहा बनवताना त्यात गूळ घातल्यानं अनेकदा चहा फाटण्याचा धोका असतो. ज्यामुळे चहाची चव बिघडते. म्हणूनच गुळाचा चहा बनवण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूया, या टिप्स फॉलो करून तुम्ही गुळाचा चवदार, परफेक्ट चहा बनवू शकता.
गुळाचा चहा करण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Jaggery Tea)
गुळाचा चहा करण्यासाठी १ कप दूध, १ कप पाणी, अर्धा चमचा ओवा, १ इंच आलं, १ छोटी वेलची, २ तुळशीची पानं, अर्धा चमचा चहा पावडर आणि किसलेला गूळ लागेल.
रश्मिका मंदानाच्या लाईट वेट साड्यांचे १० लूक; पार्टी असो की लग्नसोहळा-साधेपणातही सौंदर्य उजळेल
हिवाळ्याच्या दिवसांत गुळाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळ आल्यानंतर त्यात किसलेला गुळ, किसलेलं आलं, बारीक केलेली वेलची, तुळशीची पानं आणि चहा पावडर घालून उकळवून घ्या. गूळ पाण्यात व्यवस्थित वितळल्यानंतर गॅस बंद करा. दुसऱ्या भांड्यात दूध गरम करून घ्या. त्यानंतर चहा पावडरचं पाणी एका कपमध्ये गाळून घ्या त्यानंतर उकळलेलं दूध गरमागरम चहाच्या पाण्यात घाला.
ही चूक करणं टाळा
गुळाचा चहा करताना अनेकदा लोक एकत्र सर्व साहित्य घालतात. ज्यामुळे गुळाचा चहा फाटू शकतो. खासकरून चहात गूळ आणि दूध एकत्र अजिबात घालू नका. गुळाच्या चहात थंड दूध एकत्र करणं टाळा. या टिप्स फॉलो केल्यास गुळाचा चहा कधीच फाटणार नाही.
डोक्यावर पांढरे केसच पुष्कळ आलेत? जेवणाच्या ताटात हे ५ नेहमी घ्या, काळा होईल प्रत्येक केस
गुळाचा चहा पिण्याचे फायदे
१) हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही दिवसांतून २ वेळा गुळाचा चहा पिऊ शकता.
२) नियमित गुळाचा चहा प्यायल्यानं इम्यूनिटी मजबूत होते.
३) शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि वजन कमी करण्यासही मदत होते.