Lokmat Sakhi >Food > गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

Make Jaggery Tea without ruining the milk : गुळाचा चहा घरी करायचा म्हंटला की चहा नासायची भीती वाटते त्यासाठीच या ५ उपयुक्त टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 05:11 PM2023-08-10T17:11:22+5:302023-08-10T17:25:51+5:30

Make Jaggery Tea without ruining the milk : गुळाचा चहा घरी करायचा म्हंटला की चहा नासायची भीती वाटते त्यासाठीच या ५ उपयुक्त टिप्स...

How to make jaggery tea so that the tea does not split ? | गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

साखर खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर त्याचे वाईट दुष्परिणाम दिसून येतात. सध्याच्या काळात सगळेच आपल्या आरोग्याची खूप काळजी घेताना दिसतात. अशावेळी आपल्यापैकी काहीजण साखर खाणे पूर्णपणे बंद करून त्या ऐवजी गुळाचा वापर करतात. साखर खायची पूर्णपणे बंद केली तर काही ठराविक पदार्थ जसे की चहा, हे पदार्थ चवीला गोड कसे लागणार. चहा गोड नसेल तर अनेकजण तो पिणे टाळतात. साखर नको म्हणून इतर सगळे गोड पदार्थ खाणं आपण एकवेळ टाळू शकतो, परंतु चहा पिणे काहीजण थांबवू शकत नाही. अशावेळी चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो. 

दिवसभरातून भरपूर नाही पण किमान सकाळचा आणि संध्याकाळचा चहा अनेक जणांना हवाच असतो. साखरेशिवाय चहा पिण्यात काही मजा नाही. म्हणूनच तर मग चहा प्यायचा तर गुळाचा असा एक हेल्दी पर्याय आता आपल्यासमोर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे हल्ली प्रत्येक नाक्यावर, किंवा रस्त्याच्या कडेला गुळाचा चहा बनवून देणारी दुकाने थाटलेली आपण बघतो. गुळाचा चहा हा चवीला अतिशय उत्तम लागतो व तो आरोग्याच्या दृष्टीने देखील फारसा हानिकारक नसतो. गुळाचा चहा आपल्यालाही घरी अगदी सहज बनवता येतो. फक्त त्यासाठी काही चूका टाळल्या पाहिजेत आणि गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत(How to make jaggery tea so that the tea does not split ?).

गुळाचा चहा नेमका कसा बनवायचा ? 

साहित्य :- 

१. पाणी - १ कप 
२. चहा पावडर - १ टेबलस्पून 
३. वेलची पूड - १/४ टेबलस्पून 
४. जायफळ पूड - चिमूटभर 
५. दूध - १ कप 
६. गूळ - १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेला)

सकाळचा पहिला चहा बिघडला-पांचट झाला तर मूड जातोच, ४ टिप्स- चहा होईल फक्कड...

घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...

कृती :-

१. गुळाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात एक कप पाणी उकळायला ठेवा.
२. पाणी किंचित हलके उकळून झाल्यानंतर त्यात चहा पावडर, वेलीची पूड, जायफळ पूड घालावी. 
३. आता हे मिश्रण हलकेच चमच्याने ढवळून घेऊन उकळण्यासाठी ठेवावे. 

फक्त १० मिनिटांत घरीच करा हलका-जाळीदार ढोकळा, मिश्रण न फेटता, न आंबवता करा ढोकळा...

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...

४. चहा उकळल्यानंतर, गॅसची आच मंद करुन त्यात दूध घालावे. 
५. चहामध्ये दूध घातल्यानंतर सर्वात शेवटी गॅस बंद करून त्यात किसलेला गूळ घालावा. 
६. किसलेला गूळ घातल्यानंतर हा चहा हलकेच उकळवून घ्यावा. 

आपला गुळाचा चहा पिण्यासाठी तयार आहे. 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

गुळाचा चहा बनवताना फाटू नये यासाठी काही खास टिप्स... 

१. गुळाचा चहा कपात ओतल्यानंतर गरम गरमच प्यावा. कारण जास्तवेळ ठेवल्यास तो फाटण्याची शक्यता असते.  
२. चहा बनवताना त्यात गूळ वापरताना गूळ हा व्यवस्थित बारीक किसलेला हवा, त्याच्या गुठळ्या होता कामा नये. गुठळ्या असलेला गूळ घातल्यास चहा फुटण्याची शक्यता असते. 
३. चहासाठी गूळ वापरताना तो शक्यतो सेंद्रिय गूळ वापरावा, पिवळ्या रंगाच्या गुळामध्ये सोडा मिसळलेला असतो. या सोड्यामुळे चहा फाटण्याची शक्यता असते. 
४. चहामध्ये गूळ घालत असताना गॅस बंद करून मगच गूळ घालावा. अन्यथा चहा फाटू शकतो. 
५. जर आपण दूध उकळण्याआधी चहामध्ये गूळ किंवा गूळाची पावडर घातली तर आपला चहा खराब होतो. कारण गुळामुळे दूध फाटतं आणि चहाची चव बिघडते. यासाठीच गुळाचा चहा करताना नेहमी याबाबत सावध असणं गरजेचं आहे. चहात दूध टाकून ते पूर्णपणे उकळल्यावरच चहात गूळ किंवा गुळाची पावडर घालावी. जर आपल्याकडे गुळाची पावडर असेल तर चहा कपात ओतल्यावर आपल्या आवडीप्रमाणे गूळ पावडर चहात घालू शकता. ज्यामुळे घरातील प्रत्येकाला त्यांच्या आवडीप्रमाणे चहा जास्त अथवा कमी गोडीचा करता येऊ शकतो.

Web Title: How to make jaggery tea so that the tea does not split ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.