Lokmat Sakhi >Food > स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच..

स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच..

Independence Day Special : How to make Jalebi Recipe at Home गरमागरम जिलेबी बाहेर विकत मिळत असली तरी, स्वातंत्र्यदिन घरी जिलेबी करुन साजरा करायची गोष्टच खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 01:15 PM2023-08-14T13:15:59+5:302023-08-14T16:31:02+5:30

Independence Day Special : How to make Jalebi Recipe at Home गरमागरम जिलेबी बाहेर विकत मिळत असली तरी, स्वातंत्र्यदिन घरी जिलेबी करुन साजरा करायची गोष्टच खास

How to make Jalebi Recipe at Home | स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच..

स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच..

'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' भारतामध्ये दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. यंदा भारत ७६वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.  १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी गर्व करण्याचा दिवस आहे. संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून उत्साहाने साजरा केला जातो.

या दिवशी गोड पदार्थ म्हणून काही ठिकाणी जिलेबी वाटली जाते. गोल - गोल आकाराची, पाकात बुडालेली जिलेबी खायला चविष्ट लागते. आपण ही जिलेबी घरी देखील ट्राय करून पाहू शकता. वाटते तितकी ही रेसिपी अवघड नसून, झटपट तयार होते. चला तर मग घरच्या साहित्यात जिलेबी कशी तयार करायची हे पाहूयात(How to make Jalebi Recipe at Home).

जिलेबी करण्यासाठी लागणारं साहित्य

मैदा

बेकिंग सोडा

ना जास्त मेहनत, ना गॅसचा वापर-झटपट करा मलई बर्फी, सणासुदीसाठी स्पेशल डिश

पाणी

साखर

दूध

वेलची पूड

केशर

तेल

सुकामेवा

कृती

सर्वप्रथम, एका वाटीत एक कप मैदा, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा आणि गरजेनुसार पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा. बॅटर तयार झाल्यानंतर त्यावर झाकण ठेऊन ६ ते ८ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा. दुसरीकडे पाक तयार करून घ्या. यासाठी एका पॅनमध्ये ४ कप साखर, २ कप पाणी घालून चमच्याने ढवळत राहा. जेणेकरून साखर लवकर विरघळेल. साखर विरघळल्यानंतर त्यात दोन चमचे दूध घाला. पाकाला उकळी आल्यानंतर दुधाचा थर चमच्याने काढून घ्या. नंतर त्यात अर्धा चमचा वेलची पूड आणि केशर घालून मिक्स करा. पाकाला घट्टपणा आल्यानंतर गॅस बंद करा.

मुठभर कडीपत्त्याची ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी, सोपी रेसिपी-चवीला भारी

दुसरीकडे पॅनमध्ये तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. आंबवण्यासाठी ठेवलेलं पीठ हाताने मिक्स करा. त्यात पिवळ्या रंगाचा फूड कलर मिक्स करा. एक मोठा ग्लास घ्या, त्यात कापड किंवा पायपिंग बॅग ठेवा. कापडाला लहान छिद्र तयार करा. त्यात तयार बॅटर घालून  बॅग किंवा कापड गोल गुंडाळून टाईट पकडा. गोल - गोल फिरवून तेलावर जिलेबीचा आकार तयार करा. मध्यम आचेवर जिलेबी दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. व तयार जिलेबी साखरेच्या पाकात बुडवून ठेवा. ५ मिनिटानंतर जिलेबी डिशमध्ये काढून ठेवा. त्यावर सुकामेवा आणि केशर पसरवून डिश सर्व्ह करा.

Web Title: How to make Jalebi Recipe at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.