Lokmat Sakhi >Food > कोण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? १ सोपी रेसिपी, हिवाळ्यात ताटात हवीच जवसाची पौष्टिक चटणी 

कोण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? १ सोपी रेसिपी, हिवाळ्यात ताटात हवीच जवसाची पौष्टिक चटणी 

Food And Recipe: परफेक्ट चवीची खमंग अशी जवसाची चटणी करायची असेल तर ही रेसिपी एकदा बघाच (Flax seed or javas chutney recipe).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 09:13 AM2023-10-27T09:13:59+5:302023-10-27T09:15:02+5:30

Food And Recipe: परफेक्ट चवीची खमंग अशी जवसाची चटणी करायची असेल तर ही रेसिपी एकदा बघाच (Flax seed or javas chutney recipe).

How to make javas or flax seed chutney? Flax seed or javas chutney recipe, Benefits of eating javas or flax seed | कोण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? १ सोपी रेसिपी, हिवाळ्यात ताटात हवीच जवसाची पौष्टिक चटणी 

कोण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? १ सोपी रेसिपी, हिवाळ्यात ताटात हवीच जवसाची पौष्टिक चटणी 

Highlightsदररोज थोडे जवस अगदी आवर्जून पोटात जायलाच पाहिजेत. हिवाळ्याच्या दिवसात तर जवस खाणे अधिक आरोग्यदायी मानले जाते. 

हिवाळा येतोय.... त्यामुळे रोजच्या जेवणात तोंडी लावायला चवदार- खमंग अशी जवसाची चटणी असायलाच पाहिजे. काह जणींच्या हातची जवसाची चटणी खूप अफलातून चवीची असते. चटणीची चव एवढी परफेक्ट जमून आलेली असते की एखाद्यावेळी मग जेवणात भाजी नसली तरी चालेलं. चटणी पोळीचा बेतही अगदी चवदार लागतो. पण काही जणींना मात्र काही केल्या जवसाची चटणी जमत नाही (How to make javas or flax seed chutney?). त्यांच्या हातची चटणी नेहमीच पांचट होते. अशी चटणी मग जेवणात तोंडी लावायला घ्यायलाही नको वाटते. म्हणूनच आता अगदी उत्तम चवीची जवसाची चटणी कशी करायची ते पाहूया (Flax seed or javas chutney recipe)...

 

जवस खाण्याचे फायदे

आपल्या रोजच्या जेवणात थोडे का असेना पण जवस असायलाच पाहिजेत. कारण जवसामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. जवस खाणे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप चांगले असते.

‘तो’ चक्क दुकानात पुतळा बनून उभा राहिला, दुकानच लुटून घेऊन गेला, पाहा चोराचं भन्नाट डोकं

शिवाय जवस खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण, ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्टरॉल नियंत्रणात राहते. हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठीही जवसाचा खूप फायदा होतो. त्यामुळे चटणीच्या माध्यमातून का होईना, पण दररोज थोडे जवस अगदी आवर्जून पोटात जायलाच पाहिजेत. हिवाळ्याच्या दिवसात तर जवस खाणे अधिक आरोग्यदायी मानले जाते. 

 

जवसाची चटणी करण्याची रेसिपी

साहित्य 

पाऊण वाटी जवस

पाव वाटीपेक्षा थोडे कमी तीळ

‘करु नकोस’ असं म्हंटलं की मुलं मुद्दाम तीच गोष्ट करतात? बघा काय केलं तर मुलं शहाण्यासारखं ऐकतील

४ ते ५ लाल वाळलेल्या लाल मिरच्या

लसूणाच्या १० ते १२ पाकळ्या

कढीपत्त्याची ८ ते १० पाने

चवीनुसार मीठ आणि लाल तिखट

 

कृती

१. सगळ्यात आधी गॅसवर कढई तापायला ठेवा आणि त्यात जवस टाकून भाजून घ्या. खूप जास्त भाजू नका. थोडा खरपूर वास आला की ते एका ताटलीत काढून ठेवा.

२. जवस भाजून झाले की त्याच कढईत तीळ आणि कढीपत्ता एकेक करून भाजून घ्या.

३. भाजलेले जवस, तीळ आणि कढीपत्ता थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका.

दिवाळीसाठी लेटेस्ट फॅशनचं ब्लाऊज शिवायचंय? बघा मागच्या गळ्याचे ६ सुपरट्रेण्डी- स्टायलिश डिझाईन्स

४. त्यानंतर लसूण, मिरच्या, मीठ आणि गरज वाटत असेल तर तिखट असं सगळं मिक्सरमध्ये टाका आणि सगळं मिश्रण एकत्रितपणे वाटून त्याची बारीक पावडर करून घ्या.

५. तुम्ही जेवढी बारीक पावडर कराल, तेवढी चटणीची चव आणखी खुलत जाईल. तसेच जवसाच्या चटणीत लसूणाचे प्रमाण थोडे जास्तच हवे. तरच चटणी खमंग आणि चवदार होते.

६. आता ही चटणी एका बरणीत भरून ठेवा. चटणी ताटात वाढून घेतल्यावर त्यावर थोडं कच्चं तेल टाका. चटणीचा स्वाद आणखी बहरेल. 

 

Web Title: How to make javas or flax seed chutney? Flax seed or javas chutney recipe, Benefits of eating javas or flax seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.