Join us  

भाकरी थापताना तुटते-कधी कडक होते? टम्म फुगलेली, मऊ ज्वारीची भाकरी करण्याची सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 1:27 PM

How to Make Jawar Bhakri : भाकरी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता ज्यामुळे तुमचं काम सोपं होईल.

चपातीपेक्षा (Chapati)  भाकरी पौष्टीक असं तुम्ही खूपदा ऐकलं असेल पण भाकरी बनवणं सर्वांनाच जमत असं नाही. भाकरी खूपच कडक होते, भाकरी नीट शेकता येत नाही अशी अनेकांची  तक्रार असते. भाकरी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता ज्यामुळे तुमचं काम सोपं होईल (How To Make Jowar Bhakri Soft, Perfect). ज्वारीची भाकरी करण्याासाठी परातीत ज्वारीचं पीठ घ्या. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. गव्हाच्या पीठाप्रमाणेच तुम्ही  हे पीठ मळताना पाणी घालू शकता. (How To Make Jowar Bhakri Soft)

एकाचवेळी जास्त पाणी घालणं टाळा, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळू शकता. भाकरी बनवताना कधीच सगळ्या भाकऱ्याचं पीठ एकत्र मळू नका. एका-एका भाकरीसाठी लागणारं पीठ घेऊन पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घ्या.  १ ते २ मिनिटं पीठ व्यवस्थित मळून घ्या.

भाकरीचं पीठ खूप जुनं झालं असेल, भाकरी थापताना तुटत असेल तर तुम्ही गरम पाणी वापरून भाकरीचं पीठ मळू शकता पण जर पीठ ताजं असेल तर तुम्ही भाकरीचं पीठ साध्या पाण्यात मळू शकता.  जर तुम्हाला परातीत भाकरी थापायला जमत असेल तर परातीत थापा पण जर तुम्ही नवशिके असाल तर पोळपाटावर भाकरी थापू शकता. 

पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, वितळेल चरबी-फिट दिसाल

पोळपाटावर खूप जास्त पीठ टाकू नका आणि खूप कमी पीठही घालू नका. अन्यथा भाकरी चिकटू शकते. सुरूवातीला एका हातानं भाकरी थापून घ्या. भाकरी थापण्यासाठी हाताच्या तळ भागाचा वापर करा. जर भाकरी हाताला चिकटते असं वाटत असेल तर तुम्ही हाताला थोडं पीठ लावू शकता. नंतर दोन्ही हातांचा वापर करून भाकरी थापून घ्या. एकाच हातानं पूर्ण भाकरी थापली तरी चालेल. कडेने भाकरी फिरवत फिरवत थापून घ्या. 

दुधापेक्षा ८ पट जास्त कॅल्शियम देतात 'हे' पांढरे दाणे; आयुर्वेदीक डॉक्टरांचा दावा-२०६ हाडं होतील मजबूत

तवा तापल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा नंतर त्यावर भाकरी ठेवा आणि भाकरीला पाणी लावून घ्या. नंतर मध्यम आच ठेवून गॅस कमी करून घ्या. १० ते १५ सेकंदांनी पाणी सुकल्यानंतर भाकरी उलटवून घ्या. नंतर १ ते अर्धा मिनिटांत भाकरी भाजून घ्या. भाकरी शिजल्यानंतर ५ सेकंद पुन्हा गॅसवर भाजून घ्या. नंतर भाकरी चाळणीवर काढून घ्या.  याच पद्धतीनं सगळ्या भाकरी भाजून घ्या. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स