Join us  

मक्याचे पॉपकॉर्न नेहमीचे, पौष्टिक हवं तर करा चटपटीत ‘ज्वारी पॉपकॉर्न’! पावसात चविष्ट कर्रमकुर्रम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 2:35 PM

How To Make Jowar Popcorn At Home, Make It Within Just 10 Minutes Quickly : ज्वारीचे पॉपकॉर्न घरीच पटकन करता येतात, ही घ्या सोपी रेसिपी...

मस्त गरमागरम, पिवळे - पांढरे, खारट, तिखट अशा असंख्य चवीचे असणारे पॉपकॉर्न खायला कुणाला नाही आवडत. मस्त मुसळदार कोसळणाऱ्या पावसात, किंवा एखादा आवडीचा सिनेमा बघताना, मित्र - मैत्रिणींशी गप्पा टप्पा करताना याच्या जोडीला पॉपकॉर्न असतील तर अजून काय हवं... पॉपकॉर्न हा एक असा स्नॅक्सचा प्रकार आहे की तो जगभर अतिशय प्रसिद्ध आहे. पॉपकॉर्न म्हटलं की, मक्याचे कठीण दाणे गरम करून फुगवले जातात आणि मक्याच्या या फुगलेल्या दाण्यांना 'पॉपकॉर्न' म्हणतात. हे पॉपकॉर्न फुलवून खाताना मक्याचे दाणे तेल किंवा तुपात भाजून मग ते फुलवले जातात. परंतु आजकाल आपण सगळेच आपल्या आरोग्याची काळजी घेताना शक्यतो तेल, तूप असे पदार्थ खाणे टाळतोच. त्याचबरोबर पॉपकॉर्नमध्ये असणाऱ्या अतिरिक्त मीठ, मसाला याच्या वापरामुळे आपण काहीवेळा ते खाणे टाळतो. 

मक्याच्या दाण्यांपासून तयार होणारे हे पॉपकॉर्न तसे पौष्टिक तर आहेच, परंतु आपण थोडा बदल म्हणून ज्वारीचे देखील पॉपकॉर्न बनवू शकतो. ज्वारीचे पॉपकॉर्न हे खाण्यासाठी अतिशय छान लागतात. इतकेच नव्हे तर हे मक्याच्या दाण्यांच्या पॉपकॉर्नपेक्षा अधिक पौष्टिक व आरोग्यास अधिक पोषणूल्य देखील देतात. ज्वारीचे पॉपकॉर्न हे मक्यांच्या दाण्यांपासून तयार होणाऱ्या पॉपकॉर्नपेक्षा अधिक चांगले व झटपट तयार होतात. ज्वारीचे पॉपकॉर्न घरच्या घरी बनवण्याची एक सोपी कृती पाहूयात(How To Make Jowar Popcorn At Home, Make It Within Just 10 Minutes Quickly).

साहित्य - 

१. ज्वारी - १ कप २. पाणी - ५ कप ३. मीठ - चवीनुसार ४. लाल तिखट मसाला - चवीनुसार 

सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...

कृती :- 

१. सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात ५ कप पाणी घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर थोडे गरम करून घ्यावे. २. पाणी गरम झाल्यानंतर त्यात १ कप ज्वारीचे दाणे घालावे. ३. आता हे दाणे किमान २ ते ३ मिनिटे थोडे शिजवून घ्यावेत. ४. त्यानंतर गॅस बंद करून एका गाळणीने गाळून त्यातील पाणी वेगळे काढून घ्यावे. ५. आता एका मोठ्या डिशमध्ये एक कॉटनचा रुमाल अंथरून त्यांवर हे दाणे वाळण्यासाठी ठेवून द्यावेत. 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...

६. हे ज्वारीचे दाणे, किमान २ तास किंवा एक संपूर्ण दिवसभर वाळवून घेतले तरी चालतील. ७. आता हे ज्वारीचे दाणे संपूर्णपणे वाळून झाल्यानंतर एका पॅनमध्ये हे ज्वारीचे दाणे ओतून घ्यावेत. ८. त्यानंतर या गरम पॅनच्या उष्णतेने ज्वारीचे दाणे हळुहळु फुलू लागतील. ९. ज्वारीचे दाणे फुलून बाहेर उडू नये म्हणून त्या पॅनवर झाकण ठेवून व्यवस्थित झाकून घ्यावे. १०. आता हे पॉपकॉर्न पूर्णपणे फुलून तयार झाल्यानंतर त्यावर हवे असल्यास आपल्या आवडीनुसार, मीठ व मसाला भुरभुरवून घालावा.

पॉपकॉर्न सूप टेस्ट केलं का? सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर सांगतात पॉपकॉर्न सूपची खास रेसिपी... 

मस्त गरमागरम ज्वारीचे हेल्दी पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :अन्नपाककृती