Lokmat Sakhi >Food > ज्वारीचा चीक कधी खाल्ला आहे, पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी-ज्वारीच्या चिकाचे पापड, फुलतात दुप्पट

ज्वारीचा चीक कधी खाल्ला आहे, पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी-ज्वारीच्या चिकाचे पापड, फुलतात दुप्पट

How to make jowar papad at home: Summer special Maharashtrian recipes: Khandeshi cuisine recipes: Homemade papad recipe: Valvanacha padarth: Bibdya recipe traditional: आपल्यालाही पारंपरिक पद्धतीने चिक काढून दुप्पट फुलणारे ज्वारीचे पापड बनवायचे असतील तर ही सोपी रेसिपी पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 13:43 IST2025-04-08T13:42:02+5:302025-04-08T13:43:49+5:30

How to make jowar papad at home: Summer special Maharashtrian recipes: Khandeshi cuisine recipes: Homemade papad recipe: Valvanacha padarth: Bibdya recipe traditional: आपल्यालाही पारंपरिक पद्धतीने चिक काढून दुप्पट फुलणारे ज्वारीचे पापड बनवायचे असतील तर ही सोपी रेसिपी पाहा.

How to make jwariche papad traditional Khandeshi Bibdya Recipe summer special valvanacha padarth | ज्वारीचा चीक कधी खाल्ला आहे, पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी-ज्वारीच्या चिकाचे पापड, फुलतात दुप्पट

ज्वारीचा चीक कधी खाल्ला आहे, पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी-ज्वारीच्या चिकाचे पापड, फुलतात दुप्पट

उन्हाळा सुरु झाला की आपण वाळवणाचे पदार्थ बनवतो. वर्षभर टिकतील आणि हवे तेव्हा खाता येतील अशा पदार्थांची रेलचेल या काळात आपल्याला पाहायला मिळते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घरोघरी काही ना काही वाळवणाचे पदार्थ बनवले जातच असतील.(Homemade papad recipe) यामध्ये चकल्या, चिप्स, पापड, लोणची, चटण्या यांसारखे पदार्थ आपण बनवत असूच. (How to make traditional Jwariche Papad at home)
पापड म्हटलं की अनेक पीठापासून बनवले जातात.(Step-by-step Bibdya recipe from Khandesh) ज्वारी, नाचणी, तांदूळ, उडदाची डाळ, साबूदाणा, पोहे यांपासून पापड बनवून त्याची चव चाखली जाते.(Authentic Maharashtrian papad recipe using jowar) अनेकदा घरात पापड बनवताना ते फसतात. तळताना ते वातट किंवा अधिक कडक होतात, व्यवस्थित फुलत नाही.(Summer food tradition from Khandesh Bibdya papad) त्याचे प्रमाण किंवा चीक नीट निघाले नाही तर ते पापड नीटसे बनत नाही.(How to make jowar papad at home) त्याला पुरेशा प्रमाणात उन्ह मिळाले नाही तर ते काही दिवसातच त्यांना बुरशी लागते. जर आपल्यालाही पारंपरिक पद्धतीने चिक काढून दुप्पट फुलणारे ज्वारीचे पापड बनवायचे असतील तर ही सोपी रेसिपी पाहा. बनवताना या काही टिप्स लक्षात ठेवा, ज्यामुळे वर्षभर पापड टिकण्यास मदत होईल. 

न थापता करा गरमागरम कोबीच्या कुरकुरीत वड्या, कोबीची भाजी आवडत नाही म्हणणारेही खातील आवडीने

साहित्य 
ज्वारी - १ किलो
मीठ - चवीनुसार 
तीळ - २ टेबलस्पून

">

कृती 

1. सगळ्यात आधी ज्वारी नीट साफ करुन चाळून घ्या. त्यानंतर २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाणी घालून तीन दिवस- रात्र भिजत ठेवा. रोजच्या रोज ज्वारीमधले पाणी बदलत राहा. हलक्या हाताने ज्वारी स्वच्छ करून पुन्हा पाणी बदलून ठेवायची. 

2. तीन दिवसानंतर ज्वारीतले पाणी गाळून घ्या. पुन्हा एकदा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवा. सुती कापडामध्ये ज्वारी पसरवून फॅन खाली दोन तास सुकवत ठेवा. सुकल्यानंतर थोड्या प्रमाणात घेऊन ज्वारी मिक्स दळून घ्या. तयार झालेले पीठ चाळून घ्या. 

3. टोपात ज्वारीचे पीठ घेऊन त्यात थोड थोड पाणी घाला. गुठळया जमणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर त्यात भरपूर पाणी घालून रात्रभर झाकूण ठेवा. 

4. दुसऱ्या दिवशी वर साठलेले पाणी फेकून द्या. आतल पीठ हलणार नाही याची काळजी घ्याल. ज्वारीचा चिक तयार होईल. 

5. चीक एका टोपात काढून घ्या. त्यानंतर गॅसवर मोठा जाड बुंदाचा टोप घेऊन चीक निघालेल्या टोपाच्या मापा इतपत ३ पट पाणी घाला. 

6. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीपुरता मीठ, पांढरे तीळ आणि हळूहळू ज्वारीचे चीक घाला. दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळत राहा. ज्यामुळे पीठाच्या गुठळ्या होणार नाही. 

7. मंद आचेवर पीठ ४ ते ५ मिनिटे ढवळत राहा. पीठ घट्ट झाल्यानंतर त्यात थोडे गरम पाणी घालून पुन्हा ढवळून घ्या. झाकण ठेवून २० ते २५ मिनिटे शिजू द्या, प्रत्येक पाच मिनिटांने झाकण काढून ढवळत राहा. 

8. मिश्रण शिजल्यानंतर त्याचा रंग पांढरा होईल. त्यानंतर पळीने एका ताटावर टाकून गोल फिरवून घ्या. ज्यामुळे मिश्रण नीट शिजले आहे की, नाही ते कळेल. 

9. त्यानंतर पॉलिथिंन अथंरुण पळीने छोटे पापड तयार करा. उन्हामध्ये सुकत ठेवा. पापड तयार करताना मिश्रण एकदम पातळ टाकू नका. पापड तळताना ते जळतील. तयार होतील ज्वारीचे दुप्पट फुलणारे खान्देशी पद्धतीने पापड

 

Web Title: How to make jwariche papad traditional Khandeshi Bibdya Recipe summer special valvanacha padarth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.