भारतीय थाळीमध्ये भाकरी आणि चपातीला खूप महत्त्व आहे. भाकरी आणि चपातीशिवाय जेवण अपूर्ण आहे. काहींना चपाती आवडते तर, काही लोक भाकरी आवडीने खातात. चपाती, भाकरी मऊ लुसलुशीत असली की, २ घास पोटात जास्त जातात. पीठ नीट मळले गेले तर, चपाती आणि भाकरी व्यवस्थित तयार होतात. भाकरी करण्याची पद्धत ज्याला माहिती आहे, त्यालाच भाकरी नीट जमते.
भाकरी जर मऊ लुसलुशीत झाली तर, त्यासोबत पिठलं, झुणका, पालेभाजी किंवा एखादी छानशी उसळ अप्रतिम लागते. मात्र, भाकरी शिळी झाली किंवा थंड झाली की ती पुन्हा खावीशी वाटत नाही. भाकरी अधिक वेळ मऊ लुसलुशीत राहावी, यासाठी एक खास पदार्थ त्यात मिसळून भाकऱ्या तयार करा. यामुळे भाकरी लवकर कडक होणार नाही(How to make Jwarichi Bhakri, Special tips for making Bhakri).
भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य
ज्वारीचं पीठ
तांदुळाचे पीठ
पाणी
फ्लॉवरमध्ये अळ्या असतात, फार वेळ जातो चिरायला? ५ सोप्या टिप्स, पटकन चिरा फ्लॉवर
तूप
तेल
कृती
सर्वप्रथम, एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा तूप घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. नंतर त्यात एक कप ज्वारीचे पीठ, व थोडे तांदुळाचे पीठ घालून, चमच्याने सतत ढवळत राहा. उकड तयार झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. २ मिनिटानंतर झाकण काढा, व उकड एका परातीत काढून घ्या. उकड गरम असतानाच पीठ मळून घ्या. पीठ मळताना थोडं तेल लावा, व पिठाचा छोटा गोळा घेऊन पुन्हा मळून घ्या.
गणेशोत्सव स्पेशल : बाप्पाला मोदक तर आवडतातच, पण यंदा करुन पाहा मोदकाची झणझणीत आमटी!
परातीवर किंवा पोळपाट्यावर थोडे ज्वारीचे पीठ पसरवा, व हाताने भाकरी थापून घ्या. आपण भाकरी लाटून देखील घेऊ शकता. भाकरीचा तवा गरम करण्यासाठी ठेवा, जर आपल्याकडे भाकरीचा तवा नसेल तर, आपण भाकरी कोणत्याही पॅनवर शेकून घेऊ शकता. अशा प्रकारे टम्म - फुगलेली भाकरी खाण्यासाठी रेडी. जर आपण काही वेळानंतर भाकरी खाणार असाल तर, त्यावर सुती कापड ठेऊन झाकून ठेवा.