Lokmat Sakhi >Food > कच्छी दाबेली घरी करण्याची पारंपरिक रेसिपी, कच्छच्या रणात करतात तशी दाबेली, खाऊन तर पाहा....

कच्छी दाबेली घरी करण्याची पारंपरिक रेसिपी, कच्छच्या रणात करतात तशी दाबेली, खाऊन तर पाहा....

How To Make Kacchi Dabeli At Home : Kacchi Dabeli Recipe : कच्छी दाबेली म्हणून प्रसिध्द असलेली दाबेली, त्याच पारंपरिक पद्धतीने करण्याची परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 03:59 PM2023-02-28T15:59:59+5:302023-02-28T16:03:36+5:30

How To Make Kacchi Dabeli At Home : Kacchi Dabeli Recipe : कच्छी दाबेली म्हणून प्रसिध्द असलेली दाबेली, त्याच पारंपरिक पद्धतीने करण्याची परफेक्ट रेसिपी

How To Make Kacchi Dabeli At Home : Kacchi Dabeli Recipe | कच्छी दाबेली घरी करण्याची पारंपरिक रेसिपी, कच्छच्या रणात करतात तशी दाबेली, खाऊन तर पाहा....

कच्छी दाबेली घरी करण्याची पारंपरिक रेसिपी, कच्छच्या रणात करतात तशी दाबेली, खाऊन तर पाहा....

मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये सर्वात फेमस आणि चटकदार लागणारी 'कच्छी दाबेली' सर्वत्र लोकप्रिय आहे. कच्छी दाबेली मुंबई व गुजरातमधील रस्त्यांवर असणाऱ्या खाऊच्या गाड्यांवर हमखास मिळतेच. मुंबई व गुजरातमध्ये हा पदार्थ खूप मोठ्या प्रमाणांत आवडीने खाल्ला जातो. कच्छी दाबेली हे सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडणारे स्ट्रीट फूड आहे. गरमागरम बटरवर भाजलेली दाबेली आणि त्यावर मुरमुरीत शेव आणि तिखट शेंगदाणे हे नुसतं आठवलं तरी आता लगेचच कच्छी दाबेली खावीशी वाटते. 

गुजराती खाद्य संस्कृतीमधील सर्वांना आवडणारी कच्छी दाबेली नांवावरुनच समजते, की तिचा उगम कच्छ मधील आहे. पावामध्ये बटाट्याचे सारण भरुन दाबणे यासाठी गुजराती शब्द दाबेली. म्हणून या डिशचं नांव आहे कच्छी दाबेली! बऱ्याच जणांना दाबेली घरी बनवता येते असं वाटतंच नाही. पण आपण  घरच्या घरी दाबेलीचा मसाला बनवून अप्रतिम चविष्ट अशी दाबेली बनवू शकता. आपणही घरच्या घरी मस्तपैकी दाबेलीचा मसाला तयार करून घरगुती दाबेली बनवून अगदी स्ट्रीट फूड दाबेलीचा स्वाद घेऊ शकता(How To Make Kacchi Dabeli At Home : Kacchi Dabeli Recipe).

साहित्य :- 

१. तेल - १ टेबलस्पून 
२. हिंग - १/२ टेबलस्पून 
३. दाबेली मसाला - ४ टेबलस्पून 
४. बटाटे - ३ (उकडवून घेतलेले बटाटे स्मॅश करुन घ्यावेत)
५. जिरं - १ टेबलस्पून 
६. चिंचेचा कोळ - १ टेबलस्पून 
७. मीठ - चवीनुसार 
८. पाणी - गरजेनुसार 
९. ओलं खोबर - १ टेबलस्पून (किसून घेतलेले) 
१०. डाळिंबाचे दाणे - १ टेबलस्पून 
११. कोथिंबीर - १ टेबलस्पून 
१२. चिंचेची चटणी - १/२ कप 
१३. लसूण लाल तिखट चटणी - १/२ कप 
१४. मसाला शेंगदाणे - २ ते ३ टेबलस्पून 
१५. पाव - ६ ते ७
१६. कांदा - ३ ते ४ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेला)
१७. बटर - २ टेबलस्पून 
१८. पिवळी बारीक शेव - २ टेबलस्पून 

कृती :- 

१. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरं, हिंग, दाबेली मसाला व उकडलेले बटाटे घालावेत. हे सगळे मिश्रण एकजीव होऊ द्यावे. 
२. त्यानंतर या मिश्रणात चिंचेचा कोळ, पाणी, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. पाणी घालून हे बटाट्याचे मिश्रण थोडे रसरशीत करुन घ्यावे. 
३. आता गॅस बंद करुन हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून नीट सेट करुन घ्या. 
४. या तयार झालेल्या बटाट्याच्या सारणावर बारीक चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेले खोबरे, डाळिंबाचे दाणे भुरभुरवून घालावेत. 
५. आता पाव घेऊन सुरीच्या मदतीने ते मधून थोडेसे कापून घ्यावेत. 


६. त्यानंतर त्या पावाच्या आत चिंचेची गोड चटणी, लसणाची लाल तिखट चटणी लावून मग त्यात तयार झालेले बटाट्याचे सारण भरून घ्यावे. 
७. बटाट्याचे सारण अर्धे भरल्यावर त्यात थोडे मसाला शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, चिंचेची गोड चटणी, लसणाची लाल तिखट चटणी घालावी. तसेच पुन्हा आपल्या आवडीनुसार सारण भरुन घ्यावे. 

८. बटाट्याचे सारण व इतर जिन्नस पावात भरुन झाल्यानंतर आता एका पॅनवर बटर सोडून त्यावर तयार झालेली दाबेली खरपूस भाजून घ्यावी. 

कच्छी दाबेली मसाला घरच्याघरी कसा बनवाल? परफेक्ट मसाला बनवण्याची रेसिपी, करा चविष्ट दाबेली

आता खाण्यासाठी गरमागरम दाबेली तयार आहे. दाबेली सर्व्ह करताना त्यावर थोडेसे मसाला शेंगदाणे, बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा भुरभुरवून खमंग दाबेली सर्व्ह करावी.

Web Title: How To Make Kacchi Dabeli At Home : Kacchi Dabeli Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.