Join us  

समर फूड स्पेशल : उन्हाळ्यात करा करकरीत कैरीचं आंबटगोड वरण, पाहा २ पारंपरिक चमचमीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2024 9:20 AM

How to Make Amti or Dal Using Kairi: कैरीचं वरण किंवा कैरीची आमटी हा उन्हाळ्यातला एक खास पदार्थ. बघा अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं वरण कसं करायचं. (kairicha varan recipe in marathi)

ठळक मुद्देफक्त याच दिवसांत मिळणारी कैरी भरपूर प्रमाणात आहारात वापरून घ्या आणि वेगवेगळ्या पदार्थांमधून तिची छान चव चाखा

उन्हाळ्यात बहुतांश लोकांच्या आवडीची एक गोष्ट म्हणजे या दिवसांत मिळणारी हिरवीगार, ताजी कैरी. फळांचा राजा आंबादेखील याच दिवसात येतो. पण तरीही कैरीची मजा आंब्यामध्ये नाही. दोघांची आपली आपली वेगळीच मजा आहे. म्हणूनच फक्त याच दिवसांत मिळणारी कैरी भरपूर प्रमाणात आहारात वापरून घ्या आणि वेगवेगळ्या पदार्थांमधून तिची छान चव चाखा (how to make dal using kairi or raw mango). त्यासाठीच आता जेवणात रंगत आणणारं आंबट- गोड चवीचं कैरीचं वरण किंवा आमटी कशी करायची ते पाहूया.. (How to Make Amti or Dal Using Kairi)

कैरीचं वरण किंवा आमटी करण्याची रेसिपी 

 

रेसिपी १

ही रेसिपी करण्यासाठी कैरी किसून घ्या. तुरीची डाळ शिजवून घ्या. इतर कोणत्याही डाळीच्या वरणापेक्षा तुरीच्या डाळीचं कैरीचं वरण अधिक चवदार होतं. त्यामुळे कैरीचं वरण करणार असाल तर नेहमी तुरीची डाळच वापरा. आता कढईमध्ये तेल, हिंग, मोहरी, जिरे टाकून फोडणी करून घ्या.

९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने शाम्पू करतात, तुमचंही चुकतंय? बघा शाम्पू करण्याची योग्य पद्धत

यानंतर कैरीचा किस घालून चांगला परतून घ्या. कैरीचा किस चांगला परतून झाला की त्यात थोडा गरम मसाला, थोडं लाल तिखट, एखादी मिरची कडिपत्ता टाकून परतून घ्या. यानंतर त्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ घाला. तुम्हाला जेवढं पातळ वरण करायचं असेल तेवढं पाणी टाका. गुळाचा खडा आणि चवीनुसार मीठ घाला. वरण चांगलं उकळून घ्या. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेल्या कोथिंबीरीची पेरणी केली की झालं कैरीचं वरण तयार. 

रेसिपी २

 

कैरीचा आंबटपणा वरणात पुरेपूर मुरावा, असं वाटत असेल तर या दुसऱ्या पद्धतीने वरण करा. यासाठी जेव्हा तुम्ही तुरीची डाळ शिजायला लावाल, तेव्हा त्यामध्ये कैरीच्या काही फोडी टाका.

डाएटमध्ये करा ५ साधे- सोपे बदल, भराभर वजन कमी होईल- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

कैरीचं साल मात्र काढून घ्या. कैरी आणि डाळ एकत्र शिजवून घेतलं की नेहमी करतो तसं फोडणी देऊन वरण करा. गुळाचा खडा, कडिपत्ता, कोथिंबीर, जिरेपूड असे सगळे पदार्थ असले की आमटीला अधिक चव येते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीसमर स्पेशल