Join us  

घरात कैरी असो नसो २ मिनिटांत बनवा थंडगार पन्हं ! पाहा ही जादू कशी करायची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 5:09 PM

How To Make Kairi Panha At Home : Easy Recipe : रणरणत्या उन्हात पन्हं पिण्यासारखं सुख नाही, कैरी घरात नसली तरी पन्हं करण्याची एक सोपी ट्रिक

कैरीचं पन्ह हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांपैकी सर्वांचं आवडत शीतपेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात आपल्याला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करते. कैरी, आंबा यांसारख्या फळांचं आकर्षण जेवढं असतं, तेवढंच आकर्षण त्यांच्यापासून बनविलेल्या पदार्थांचं असतं. म्हणूनच तर उन्हाळा सुरू होताच घरोघरी कैरीचं पन्हं, कैरीचं आंबटगोड लोणचं असे विविध पदार्थ बनवणं सुरू होत. कच्च्या कैऱ्यांचा वापर करून आंब्याचे पन्हे तयार केले जाते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था निरोगी राहते. पन्ह प्यायल्याने आपल्याला लगेच ताजेतवाने आणि ऊर्जेने भरलेले वाटते. यासोबतच उन्हाळ्यातील डिहायड्रेशनचा त्रास देखील होत नाही.

सध्या उन्हाळा सुरु झाला. या दरम्यान बाजारात मस्त हिरव्यागार आंबट - गोड कैऱ्या विकत मिळतात. आपल्याकडे दर उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्ह बनवण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात आपण जसे लोणची, पापड, कुरडया हमखास बनतो तसेच आंबट गोड चवीचे पन्ह देखील बनवलं जात. कैरीच्या पन्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्याचे सेवन केल्यामुळे पचनस्वास्थ्य चांगले राहाते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याचे पन्हे प्यायल्याने पोट साफ राहते. असे हे बहुगुणी कैरीचे पन्हे घरच्या घरी बनवून स्टोअर करण्याची योग्य पद्धत समजून घेऊयात(How To Make Kairi Panha At Home).

साहित्य :- 

१. कच्च्या कैऱ्या - ६ ते ८ २. साखर - २ कप ३. पाणी - २ कप ४. पुदिन्याची पाने - १०० ग्रॅम ५. जिरे - २ टेबलस्पून ६. काळे मीठ - १ टेबलस्पून ७. सैंधव मीठ / साधे मीठ - १ टेबलस्पून

कृती :- 

१. सर्वप्रथम कच्च्या कैरीच्या साली काढून सगळ्या कैऱ्या सोलून घ्याव्यात. २. आता या कच्च्या कैऱ्यांचे लहान लहान तुकडे करावेत. ३. त्यानंतर एका कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात या कैऱ्यांचे लहान तुकडे, पाणी, साखर घालून कुकरच्या २ शिट्ट्या काढून शिजवून घ्यावेत. ४. आता मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, जिरे, पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट करुन घ्यावी. ५. कुकरमधील मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर, हे मिश्रण गाळणीत ओतून, गाळणीने गाळून घ्यावे. 

६. त्यानंतर पुदिन्याची तयार केलेली पातळ पेस्टदेखील याच गाळणीतून गाळून घ्यावी. ७. कच्च्या कैरीचे शिजवून घेतलेले मिश्रण व पुदिन्याची तयार केलेली पेस्ट ही दोन्ही मिश्रण एकत्रित करुन एका पॅनमध्ये ओतून गॅसवर एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यावे. ८. मंद आचेवर हे मिश्रण शिजवून घेत असताना त्यात काळे मीठ व साधे मीठ चवीनुसार घालावे. आता हे मिश्रण २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावे. ९. मिश्रण शिजवून झाल्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावे. 

कैरीच्या पन्ह्याचे प्रिमिक्स तयार आहे. कैरीच्या पन्ह्याचे हे प्रिमिक्स एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून द्यावे. अशा प्रकारे कैरीच पन्ह स्टोअर करुन ठेवल्यास पुढील ६ महिन्यांसाठी पन्ह चांगले टिकते. तसेच या प्रिमिक्समुळे आपण ऐन उन्हाळ्यांत झटपट कैरीच पन्ह तयार करुन पिऊ शकता. एका ग्लासमध्ये हे प्रिमिक्स २ ते ३ चमचे घेऊन त्यात थंड पाणी घालून चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. अशाप्रकारे उन्हाळ्यात आपण झटपट कैरीच पन्ह तयार करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृती