रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, शंकरपाळे, करंजी, अनारसे हे सगळे गोड पदार्थ दिवाळीत सगळेच जण करतात. दोन- तीन दिवसांनी तर हे सगळे पदार्थ खाऊन कंटाळा येऊ लागतो. म्हणूनच मग अशावेळी तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी काजूकतली करा (Kaju katli recipe). सगळ्यांपेक्षा वेगळा गोड पदार्थ... शिवाय काजुकतली सगळ्यांना आवडते आणि ती खूप गोड नसते म्हणून सगळे आवडीने खातातही. आता फक्त अर्ध्या तासात एकदम सोप्या पद्धतीने काजुकतली कशी करायची ते पाहूया....(easiest method of making kaju katli in few minutes)
काजूकतली करण्याची रेसिपी
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या masterchefmom या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
१ वाटी काजू
अर्धी वाटी साखर
अर्धी वाटी पाणी
१ टेबलस्पून तूप
चांदीचा वर्ख
कृती
सगळ्यात आधी तर काजू मिक्सरमधून फिरवून त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या.
त्यानंतर काजू पावडर गाळणीने गाळून घ्या. काजू पावडर अगदी बारीक असावी, जाडीभरडी अजिबात नको..
केसांच्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय... करून पाहा
नंतर गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यात अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी टाका.
साखर पाण्यात विरघळली की त्यामध्ये सुरुवातीला एक चमचा तूप टाका आणि नंतर काजू पावडर टाका.
काजू पावडर हळूहळू टाकावी, जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाहीत.
नंतर सगळे मिश्रण आळून येईपर्यंत ते शिजू द्यावे. यावेळी गॅस मंद असावा आणि कढईतले मिश्रण वारंवार हलवत रहावे.
दिवाळीत करा स्वत:ची हौस, घ्या नाजूक-सुंदर चांदीचे पैंजण! पाहा लेटेस्ट फॅशनचे ८ मोहक डिझाइन्स
यानंतर मिश्रणाला घट्टपणा आला की छोटासा गोळा हातात घेऊन त्याची कन्सिस्टंसी तपासावी. त्याचा जर गोल बॉल तयार झाला तर तुमचं मिश्रण तयार झालं आहे असं समजावं.
यानंतर गॅस बंद करा आणि सगळं मिश्रण बटर पेपरवर पसरवून ठेवा. त्यानंतर त्याचा गोळा करा. तो लाटून घ्या त्यावर चांदीचा वर्ख लावा आणि थंड झाल्यावर चाकूने काजुकतली कापून घ्याव्यात.