Join us  

लिटरभर दूध नासलं तर काय कराल? फेकू नका, फक्त २ स्टेप्समध्ये करा सुंदर कलाकंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 1:18 PM

Food And Recipe: फक्त २ सोप्या स्टेप्स आणि चवदार कलाकंद तयार... बघा ही सोपी रेसिपी (How to make Kalakand from milk?)

ठळक मुद्देयापुढे जर कधी दूध नासलं तर ते फेकून देऊन वाया घालवू नका. त्याच्यापासून चवदार कलाकंद करून बघा.

दूध नासलं की आपण ते फेकून देतो. पण नासलेल्या दुधाचेही अनेक उत्तम पदार्थ करता येतात. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे चवदार कलाकंद. कलाकंद करण्याची रेसिपी सुद्धा अतिशय सोपी आहे आणि शिवाय झटपट होणारी. त्यामुळे यापुढे जर कधी दूध नासलं (How to make Kalakand from milk?) तर ते फेकून देऊन वाया घालवू नका. त्याच्यापासून चवदार कलाकंद करून बघा (Easy recipe of making sweet kalakand). तुम्हाला आणि घरातल्या इतरांनाही नक्कीच आवडेल. 

 

कलाकंद करण्यासाठी लागणारं साहित्य

१. कलाकंद करण्यासाठी आपल्याला खरंतर नासलेले दूध आणि साखर या दोनच पदार्थांची गरज आहे. पण त्याला एक वेगळा स्वाद यावा आणि ते आणखी चवदार व्हावं, यासाठी तुम्ही वेलची पूड आणि केशराच्या काड्या टाकू शकता.

 

नासलेल्या दुधापासून कलाकंद करण्याची रेसिपी

१. दूध नासलेलं आहे, असं जेव्हा लक्षात येते, तेव्हा सगळ्यात आधी ते गाळून घ्या. पाणी टाकून द्या आणि त्यानंतर पनीरसारखा जो घट्ट पदार्थ पातेल्यात उरतो तो कलाकंद करण्यासाठी वापरायचा.

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणणारे ६ घरगुती उपाय. महागड्या क्रीमचीही गरज नाही, चेहरा चमकेल

२. हे घट्ट दूध एका कढईत किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात टाका आणि गॅसवर तापवायला ठेवा. स्टीलचे पातेले किंवा भांडे वापरू नका. कारण त्याचा बेस पातळ असल्याने दूध त्याला चिटकून बसते आणि जळते. दूध जसे तापेल तसं काही वेळ त्याला आणखी पाणी सुटेल. ते पाणी आटेपर्यंत शिजवा. अधून- मधून हलवत रहा. नाहीतर पदार्थ भांड्याच्या बुडाला चिटकून जळायला लागेल.

निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद

३. जेव्हा सगळं पाणी आटेल, तेव्हा त्यात साखर टाका. वेलची पावडर आणि केशराच्या काड्यादेखील त्याचवेळी टाका. सगळे मिश्रण जेव्हा व्यवस्थित आळून येईल, तेव्हा गॅस बंद करा. गरमागरम आणि अतिशय चवदार असं कलाकंद झालं तयार. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृतीपाककृती 2023