Lokmat Sakhi >Food > ढाबास्टाईल झणझणीत मसाला भाजी १० मिनिटांत तयार, त्यासाठी करून ठेवा 'हे' खास वाटण

ढाबास्टाईल झणझणीत मसाला भाजी १० मिनिटांत तयार, त्यासाठी करून ठेवा 'हे' खास वाटण

Instant Gravy Recipe For Dhaba Style Masala Sabji: कोणतीही मसालेदार भाजी करायची असेल आणि ती ही एकदम ढाबा स्टाईल तर त्यासाठी तुमच्याकडे कांदा- खोबऱ्याचं हे खास वाटण तयार करून ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 04:39 PM2024-04-10T16:39:50+5:302024-04-10T16:42:15+5:30

Instant Gravy Recipe For Dhaba Style Masala Sabji: कोणतीही मसालेदार भाजी करायची असेल आणि ती ही एकदम ढाबा स्टाईल तर त्यासाठी तुमच्याकडे कांदा- खोबऱ्याचं हे खास वाटण तयार करून ठेवा.

How to make kanda khobryache vatan, instant gravy recipe for dhaba style masala sabji, how to make spicy curry or gravy? | ढाबास्टाईल झणझणीत मसाला भाजी १० मिनिटांत तयार, त्यासाठी करून ठेवा 'हे' खास वाटण

ढाबास्टाईल झणझणीत मसाला भाजी १० मिनिटांत तयार, त्यासाठी करून ठेवा 'हे' खास वाटण

Highlightsकोणतीही महाराष्ट्रीयन मसाला भाजी करायची असेल तर तिच्यासाठी रस्सा म्हणजेच त्याचं वाटण कसं तयार करायचं याची ही खास रेसिपी

काही केल्या घरच्या भाज्यांना हॉटेलसारखी, ढाब्यासारखी चव येत नाही, असं तुमच्याकडे कोणी म्हणत असेल तर त्यांना हे खास वाटण घालून केलेली भाजी खायला द्या. मसालेदार भाज्यांना अशी परफेक्ट ढाबास्टाईल चव येईल की सगळेच जण तुम्हाला ही खास रेसिपी विचारतील. कोणतीही महाराष्ट्रीयन मसाला भाजी करायची असेल तर तिच्यासाठी जी ग्रेव्ही किंवा रस्सा आपण बनवतो, तो चवदार झाला पाहिजे (How to make kanda khobryache vatan). तो रस्सा म्हणजेच त्याचं वाटण कसं तयार करायचं याची ही खास रेसिपी बघा.. (how to make spicy curry or gravy?)

मसालेदार भाज्यांसाठी कांदा- खोबऱ्याचं वाटण तयार करण्याची रेसिपी 

 

कोणत्याही मसालेदार भाज्यांची ग्रेव्ही तयार करण्यासाठी हे वाटण तुम्ही वापरू शकता. शिवाय हे वाटण एकदा करून ठेवलं की ते २० ते २५ दिवस फ्रिजमध्ये राहू शकतं. असं तयार वाटण हाताशी असेल तर मग अगदी १० ते १५ मिनिटांत कोणतीही मसाला भाजी तयार होईल. हे वाटण करण्याची रेसिपी Smita Deo या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

ट्रिपला गेल्यावर रोपांना पाणी कोण घालणार याचं टेन्शन? बघा बागेला ऑटोमॅटिक पाणी देण्याचं जुगाड

साहित्य

अर्धी वाटी खोबऱ्याचा किस

अर्धी वाटी नारळाचा किस

२ मध्यम आकाराचे कांदे

मसाल्याचे पदार्थ

३ टेबलस्पून तेल

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की त्यात खोबरं टाकून ते भाजून घ्या. ते छान सोनेरी रंगाचं झालं की कढईतून काढून घ्या.

उन्हाळ्यात सारखं पाणी- पाणी हाेतं, घशाला कोरड पडते? डिहायड्रेशन टाळण्यासाठी 'ही' फळं खा

यानंतर त्याच कढईमध्ये नारळाचा किस टाका आणि तो ही सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. यानंतर नारळाचा किस कढईतून काढून घ्या.

आता उभा चिरलेला कांदा कढईत टाकून भाजून घ्या. कांदा थोडा सोनेरी रंगाचा व्हायला लागला की त्यात तेल घाला आणि सगळा कांदा व्यवस्थित सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.

 

कांदा परतून झाला की त्यामध्येच १० ते १२ मीरे, अर्धा चमचा जीरे, अर्धा चमचा धने, शाही जीरे, तेजपान, मोठी वेलची, छोटी वेलची, दगडफूल, थोडंसं जायफळ, तीळ असे सगळे मसाले घाला.

१ ग्लास पाणी घेऊन तपासा तुमचे केस किती हेल्दी, बघा घरच्याघरी कशी घ्यायची केसांची परीक्षा 

२ ते ३ मिनिटे सगळे मसाले परतून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि मग थोडी खसखस टाका. हा सगळा मसाला थंड झाला की खोबरे, नारळाचा किस यासोबत एकत्र करून वाटून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून हा मसाला डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या आणि गरज पडेल तसा थोडा थोडा वापरा. 

 

Web Title: How to make kanda khobryache vatan, instant gravy recipe for dhaba style masala sabji, how to make spicy curry or gravy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.