Join us  

करा कानपूर स्टाइलचा 'बुकनू' मसाला, असा खमंग मसाला पराठा तुम्ही कधी खाल्लाच नसेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 10:05 AM

कानपूर स्टाइलचा बुकनू मसाला (buknu masala) हा पोळी/पराठा किंवा पुरीला लावून खाल्ल्यास तोंडाला चव येते, पोट भरतं आणि बुकनू मसाला हा आरोग्यासाठीही (healthy buknu masala) फायदेशीर असतो.

ठळक मुद्देबुकनू मसाल्यासाठी साधं मीठ आणि सैंधव मीठ असं दोन्ही प्रकारचं मीठ लागतं.बुकनू मसाला हा चविष्ट तर लागतोच सोबत त्यात आयुर्वेदिक गुणधर्म असल्यानं पचनासही उत्तम असतो. 

स्वयंपाकघरात गेल्यावर काय करावं हेच बरेचदा सूचत नाही. विशेषत: नाश्त्याला काय करावं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना अशी परिस्थिती असते. कधी कधी समोर पर्याय खूप असतात पण वेळ देऊन काही करण्याचा कंटाळा आलेला असतो. अशा वेळेस सोपा, कमी वेळ लागेल असा पदार्थ करावासा आणि खावासा वाटतो. यासाठी मसाला पराठा किंवा मसाला पोळी किंवा मसाला पुरी हा चांगला पर्याय आहे. साधा पराठा/ पोळी / पुऱ्या करुन त्याला मसाला लावून खाव्यात. पण हा मसाला वेगळा आहे. आपला नेहमीचा काळा मसाला किंवा गोडा  मसाला नाही. कानपूर स्टाइलचा बुकनू मसाला  (buknu masala) हा पोळी/पराठा किंवा पुरीला लावून खाल्ल्यास तोंडाला चव येते, पोट भरतं आणि बुकनू मसाला हा आरोग्यासाठीही  (healthy buknu masala) फायदेशीर असतो. बुकनू मसाल्यातील आयुर्वेदिक गुणधर्मामुळे बुकनू मसाला पचनास उत्तम असतो.  बुकनू मसाला एकदा तयार करुन ठेवला की भरपूर दिवस टिकतो. त्यामुळे एखाद्या दिवशी निवांत वेळ काढून हा बुकनू मसाला (how to make buknu masala) तयार करावा.

Image: Google

कसा तयार करावा बुकनू मसाला?

बुकनू मसाला तयार करण्यासाठी 80 ग्रॅम हळद, 50 ग्रॅम हरितकी, 50 ग्रॅम सुकलेला आवळा, 25 ग्रॅम जिरे, 25 ग्रॅम ओवा, 20 ग्रॅम बडिशेप, 20 ग्रॅम मोठी वेलची, 25 ग्रॅम काळे मिरे, 25 ग्रॅम सूंठ, 25 ग्रॅम काळे मिरे, 5 ग्रॅम हिंग, पाव किलो मीठ, 100 मिली मोहरीचं तेल आणि  50 ग्रॅम सैंधव मीठ घ्यावं. 

Image: Google

बुकनू मसाला तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करावं. त्यात हरितकी, सूंठ, हळद,  वेलची हा मसाला परतून घ्यावा. तर कोरडा आवळा, ओवा, जिरे, मिरे, बडिशेप ही मसाल्याची सामग्री कोरडीच भाजून घ्यावी. तळलेले आणि भाजलेले मसाले गार होवू द्यावेत. मिक्सरमधून हे मसाले बारीक वाटून घ्यावेत.  बारीक केलेला मसाला एका भांड्यात काढून घ्यावा. त्यात साधं मीठ आणि सैंधव मीठ घालून मसाला नीट हलवून घ्यावा. हा मसाला हवाबंद डब्यात किंवा बरणीत भरुन ठेवावा. हा बुकनू मसाला पराठा/ पोळी/ पुरीला लावून खावा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती