Join us  

करंज्या तळताना फुटतात- कधी खूपच कडक होतात? सोपी रेसिपी- करंज्या होतील खुसखुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2024 3:07 PM

How To Make Karanji: गणपती, महालक्ष्मी या सणासुदीच्या निमित्ताने करंज्या करणार असाल तर परफेक्ट करंजी कशी करायची याची ही सोपी रेसिपी एकदा बघून घ्या...(simple recipe of making karanji)

ठळक मुद्देकरंजी करण्याची ही एकदम परफेक्ट रेसिपी बघून घ्या आणि गौरी- गणपतीसाठी झटपट करंज्या करा.

गणपती, महालक्ष्मी या सणांना आवर्जून केला जाणारा एक गोड पदार्थ म्हणजे करंजी. करंजी करणं अनेकींना कठीण जातं काही जणींच्या करंजीमध्ये व्यवस्थेत सारण भरलं जात नाही. त्याच्यामुळे अर्धी करंजी फिकी तर अर्धी करंजी गोड लागते. काही जणांची करंजी खूपच कडक होते, तर काहींची अगदीच वातड होते (how to make karanji?). काही जणींच्या करंज्या तळता तळताच फुटून जातात. त्यामुळे मग सगळाच गोंधळ उडतो. तुमच्या बाबतीत असं काही होऊ नये, म्हणून करंजी करण्याची ही एकदम परफेक्ट रेसिपी बघून घ्या (karanji karanyachi recipe in Marathi) आणि गौरी- गणपतीसाठी झटपट करंज्या करा.. (simple recipe of making karanji)

करंज्या करण्याची रेसिपी 

 

साहित्य 

२ वाटी मैदा

२ टेबलस्पून रवा

२ टेबलस्पून तूप 

१ वाटी खोबऱ्याचा कीस

गणपतीचं डेकोरेशन आकर्षक होण्यासाठी खास टिप्स, झटपट होईल तयारी- मखर दिसेल सुंदर

अर्धी वाटी साखर 

२ टेबलस्पून काजू बदामाचे तुकडे 

१ टेबलस्पून मनुका 

१ टेबलस्पून खसखस 

चिमूटभर मीठ 

तळण्यासाठी तेल 

 

कृती 

सगळ्यात आधी एका भांड्यात मैदा आणि रवा घ्या. त्यात तूप कोमट करून टाका. 

तूप, मैदा आणि रवा व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी टाकून पीठ मळून घ्या. 

विद्या बालन म्हणते तुमच्या भावना लोकांना महत्त्वाच्या नसतात- त्यांना फक्त हाच प्रश्न पडतो की.... 

हे पीठ थोडं घट्ट मळावं. ८ ते १० मिनिटे पीठ मळा. कारण तुम्ही जेवढे जास्त मळाल तेवढी तुमची करंजी जास्त खुसखुशीत होते. पीठ मळून झाल्यानंतर ते साधारण अर्धातास झाकून ठेवा. 

सारण तयार करण्यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये तूप टाकून सुकामेव्याचे तुकडे परतून घ्या. 

त्यानंतर त्यामध्ये खोबरं टाका आणि लालसर होईपर्यंत परतून घ्या. सगळ्यात शेवटी खसखस टाकून भाजा.

बघा मॅट लिपस्टिकला कसा द्यायचा ग्लॉसी लूक! सणासुदीला कामी येणारी भन्नाट ट्रिक- लगेच पाहा

हे मिश्रण जेव्हा थंड होईल तेव्हा त्यात पिठीसाखर टाका. 

आता कणकेचा एक छोटासा गोळा घेऊन त्याची पुरी लाटा. ही पुरी खूप पातळ लाटू नये. पुरीच्या मधल्या भागात सारण ठेवा आणि पुरीचे सगळे काठ थोडं थोडं पाणी लावून ओलसर करून घ्या. 

त्यानंतर पुरी दुमडून काठ चिटकवून घ्या. कडक तापलेल्या तेलात मध्यम आचेवर करंज्या तळून घ्या.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.गणेश चतुर्थी २०२४गणेशोत्सव