Join us

करा ‘कुरकुरीत कारली’; पदार्थच असा भारी की कारल्याची भाजीही होईल आवडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2023 13:28 IST

How to make Karela Crispy Recipe at Home कारल्याची भाजी आवडत नसेल पण कुरकुरीत कारली नावाचा हा पदार्थ खाऊन पाहाच.

'कडू कारले साखरेत घोळले तुपात तळले तरी ते कडूच' ही म्हण महाराष्ट्रात फार फेमस आहे. कारल्याच्या कडूपणामुळे त्याचा खवय्यावर्ग फार कमी आहे. कारलं जरी चवीला कडू असलं, तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे अनेक आरोग्याच्या निगडीत समस्या दूर होतात.

बहुतांश जण कारल्याची भाजी, कारल्याचा रस तयार करतात, पण आपण कधी कुरकुरे कारले ट्राय करून पाहिलं आहे का? ही रेसिपी चवीला कडू नाहीतर कुरकुरीत लागते. जे लोकं कारलं खाताना नाकं मुरडतात, ते देखील हा पदार्थ आवडीने खातील. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात(How to make Karela Crispy Recipe at Home).

कुरकुरे कारले करण्यासाठी लागणारं साहित्य

कारले

मीठ

हळद

लाल तिखट

पावसात चमचमीत खायला हवे, करा ५ मिनिटांत आलू क्रिस्पी ६५, मूडही होईल फ्रेश

बेसन

तांदळाचे पीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, कारल्याच्या बिया काढून त्याचे गोल चकत्या करून घ्या. कारल्याचे हे काप एका बाऊलमध्ये काढून ठेवा. कारल्याला मीठ लावून ३ तासांसाठी ठेवा. ३ तासानंतर दोन्ही हातांनी पिळून त्यातलं पाणी काढून घ्या. नंतर कारली स्वच्छ पाण्याने धुवा. व दोन्ही हाताने पुन्हा पिळून त्यातील अतिरिक्त पाणी काढा.

चिरलेला पालक-किसलेला बटाटा-करुन पाहा कुरकुरीत भजी, मस्त बरसत्या पावसात खमंग बेत

आता त्यात अर्धा चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक चमचा बेसन, एक चमचा तांदळाचं पीठ, घालून साहित्य एकजीव करा. त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर कारली सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे जेवताना तोंडी लावण्यासाठी कुरकुरे कारले खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स