'थालीपीठ' हा एक पारंपारिक आणि पौष्टिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. थालीपीठ वेगवेगळ्या डाळींची पीठ आणि मसाल्यांचा वापर करून बनवले जाते. हा महाराष्ट्रीयन खास पदार्थ लोकप्रिय नाश्ता किंवा एक उत्तम स्नॅक पर्याय आहे. यासोबतच तो त्याच्या अनोख्या आणि वेगळ्या फ्लेवर्ससाठी ओळखला जातो. थालीपीठ हे केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिक देखील आहे, कारण ते विविध प्रकारचे धान्य आणि मसाले एकत्र करून बनवले जाते. आपल्याकडील बहुतेक घरात थालीपीठाची भाजणी ही तयार करून ठेवलेलीच असते. कधी घाईच्या वेळी झटपट नाश्ता म्हणून किंवा कधी जेवणाचा कंटाळा आला तर पटकन थालीपीठ बनवून चटणी सोबत खाल्ली जातात(Karwar Special : Rava Thalipeeth).
थालीपीठ हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. यात आपण आपल्या आवडीच्या भाज्या किंवा इतर मसाल्याचे पदार्थ घालून छान खरपूस थालीपीठ तयार करु शकतो. परंतु काहीवेळा थालीपीठाची (Thalipeeth) भाजणी (Quick Maharashtrian Breakfast Recipe) संपते किंवा भाजणीचे पीठ भिजवून थालीपीठ करण्याइतका वेळ नसतो. अशा घाईगडबडीच्या वेळी आपण झटपट, इंस्टंट तयार होणारे कारवार स्पेशल (Karwar Style Thalipeeth) रव्याचे थालीपीठ बनवू शकतो. कारवार स्पेशल रव्याचे थालीपीठ बनवताना ते अगदी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात देखील झटपट होऊ शकते(How To Make Karwar Special Rava Thalipith).
साहित्य -
१. बारीक रवा - १ + १/२ कप
२. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
३. किसलेलं खोबरं - ३ टेबलस्पून
४. हिरव्या मिरच्या - ३ (बारीक चिरुन घेतलेल्या)
५. साखर - १ टेबलस्पून
६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
७. मीठ - चवीनुसार
८. पाणी - गरजेनुसार
९. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक रवा, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं खोबरं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी घालून हे सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत.
२. या सगळ्या मिश्रणात पाणी घालून झाल्यावर हाताने हे थालीपीठाचे मिश्रण मळून एकजीव करुन घ्यावे.
अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...
मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...
३. थालीपिठाचे हे मिश्रण एकदम सैल किंवा अधिकच घट्ट मळून घेऊ नये. हे पीठ मध्यम कंन्सिस्टंसीचे असावे.
४. आता एका पॅनमध्ये तेल घालून ते सर्वत्र पसरवून घ्यावे.
५. थालीपीठाच्या तयार मिश्रणाचा एक गोळा घेऊन तो पॅनमध्ये पसरवून घेतलेल्या तेलावर गोलाकार थापून घ्यावा, त्यानंतर बाजूने किंचित तेल सोडावे.
६. आता हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी तेलावर खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.
वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...
आपले भाजणीशिवाय झटपट तयार होणारे कारवार स्पेशल रव्याचे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे.