Join us  

तोंडाला चव आणणारी कवठाची चटपटीत चटणी- बघा ५ मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2024 5:04 PM

How To Make Kavath Chutney?: कवठाची ही चटणी एकदा करून बघाच.. रेसिपी अगदी सोपी शिवाय अवघ्या ५ मिनिटांत होणारी. (Kavath or wood apple chutney recipe in marathi)

ठळक मुद्देतोंडाला चव आणणारी चटपटीत, आंबट- गोड कवठ चटणी कशी करायची ते पाहा...

कवठ हे अतिशय आरोग्यदायी फळ आहे. शिवाय वर्षभर ते मिळत नाही. त्यामुळे सध्या कवठाचा हंगाम आहे तर भरपूर प्रमाणात कवठ खायला हवेत. काही जण कवठाचा गर काढतात आणि त्यात गूळ कालवून खातात. काही जण त्यात थोडंसं तिखटही टाकतात. आता या पद्धतीने तुम्ही नेहमीच कवठ खाता. यावेळी मात्र कवठाची चटणी करून पाहा. काही ठिकाणी या चटणीला कवठाचा ठेचा असंही म्हणतात (Kavath or wood apple chutney recipe in marathi). अतिशय उत्कृष्ठ चवीची ही चटणी जेवणात तोंडी लावायला असेल तर नक्कीच जेवणाची रंगत वाढेल आणि दोन घास जास्तीचे खाल (How to make kavath chutney?). अशी तोंडाला चव आणणारी चटपटीत, आंबट- गोड कवठ चटणी कशी करायची ते पाहा...(easy and quick recipe of kavath chutney)

कवठाची चटणी करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ मध्यम आकाराचं कवठ

७ ते ८ हिरव्या मिरच्या. तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता.

४ ते ५ टेबलस्पून गूळ

बाळाच्या बोरन्हाणला हलव्याचे दागिने घ्यायचे? बघा ३ सुंदर पर्याय, बाळ दिसेल सुंदर- गोजिरवाणं

२ टेबलस्पून जिरे

चिमूटभर हिंग

फोडणीसाठी अर्धा टेबलस्पून तेल आणि मोहरी

चवीनुसार मीठ

 

कृती

- सगळ्यात आधी कवठ फोडून त्यातला गर बाहेर काढून घ्या. गरातल्या ज्या शिरा असतात, त्या काढून टाका. बिया कोवळ्या असतील तर तशाच राहू द्या.

- कवठाचा गर, गूळ, हिरव्या मिरच्या, जिरे मिक्सरमध्ये टाका आणि चांगले बारीक वाटून घ्या.

टॉवेल धुतला तरीही त्याला कुबट वास येतो? 'या' पद्धतीने धुवा, टॉवेल होईल स्वच्छ- सुगंधी

- हे मिश्रण आता एका भांड्यात काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. 

- आता एका छोट्या कढईमध्ये तेल टाका. तेल तापलं की त्यात मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या. कवठाच्या चटणीवर ही फोडणी घाला आणि सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. कवठाची चटपटीत, आंबट- गोड चटणी झाली तयार. 

- फ्रिजमध्ये ठेवल्यास ही चटणी आठवडाभर टिकते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.