कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घरोघरी मसाला दूध केलं जातं. त्यानंतर वातावरणातला गारवा वाढतो. अशा थंड वातावरणात हल्ली बऱ्याच शहरांमध्ये आता रात्रीच्या वेळी गरमागरम मसाला दूध देण्याची दुकानं थाटली जातात. साधारण दोन ते अडीच महिने लोक थंडीच्या दिवसांत न चुकता या मसाला दुधाचा आस्वाद घ्यायला सहकुटूंब येतात (Kesar badam milk recipe). असं विकतसारखं घट्ट, पौष्टिक केशर- बदाम दूध अगदी १ मिनिटापेक्षाही कमी वेळेत घरी करायचं असेल तर ही एक रेसिपी पाहा (How to make masala dudh) आणि गारेगार थंडीत गरमागरम मसाला दूध पिण्याचा आनंद घ्या.(How To Make Kesar Badam Milk Instantly?)
केशर- बदाम मसाला दूध करण्याची रेसिपीEasy and simple recipe of masala dudh
केशर- बदाम मसाला दूध झटपट करण्यासाठी त्याची पावडर कशी तयार करून ठेवावी याची रेसिपी bank_of_delish या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
१ वाटी बदाम
पाव वाटी काजू
पाव वाटी पिस्ते
१५ ते २० केशराच्या काड्या
८ ते १० वेलची
अर्धी वाटी खडीसाखर
कृती
सगळ्यात आधी बदाम ७ ते ८ तास पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर त्याचे सालं काढून घ्या आणि ते वाळवून घ्या.
यानंतर एका कढईमध्ये हे बदाम गरम करून घ्या. जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल.
यानंतर बदाम हलकेसे भाजून घेतल्यानंतर काजू आणि पिस्तेही भाजून घ्या.
त्यानंतर वेलची आणि केशरही कढईत टाकून हलकंसं गरम करून घ्या.
कपड्यावर ऑईल पेंटचे डाग पडले? ४ सोपे उपाय करा, डाग कुठे पडले होते ते लक्षातही येणार नाही
हे सगळे पदार्थ थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या. मिक्सरमधून फिरवताना त्यात खडीसाखर देखील टाका. आवडत असल्यास थोडी हळद टाकली तरी चालेल.
ही पावडर आता एअर टाईट डबीत घालून फ्रीजमध्ये ठेवून द्या. जेव्हा केशर- बदाम दूध प्यायचं असेल तेव्हा दूध गरम करा आणि त्यात ही पावडर घाला. गरमागरम केशर- बदाम दूध तयार...