Lokmat Sakhi >Food > खा खजूर पाक, दिवसभराचा प्रोटीन डोस! रेसिपी सोपी - मुलांसह पालकांची तब्येतही होईल तंदुरुस्त...

खा खजूर पाक, दिवसभराचा प्रोटीन डोस! रेसिपी सोपी - मुलांसह पालकांची तब्येतही होईल तंदुरुस्त...

How To Make Khajur Paak At Home : हाय प्रोटिन खजूर पाक, प्रोटीनचा उत्तम स्रोत, बनवायलाही सोपे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 12:28 PM2023-03-23T12:28:30+5:302023-03-23T12:44:33+5:30

How To Make Khajur Paak At Home : हाय प्रोटिन खजूर पाक, प्रोटीनचा उत्तम स्रोत, बनवायलाही सोपे...

How To Make Khajur Paak At Home | खा खजूर पाक, दिवसभराचा प्रोटीन डोस! रेसिपी सोपी - मुलांसह पालकांची तब्येतही होईल तंदुरुस्त...

खा खजूर पाक, दिवसभराचा प्रोटीन डोस! रेसिपी सोपी - मुलांसह पालकांची तब्येतही होईल तंदुरुस्त...

दिवसाची हेल्दी सुरुवात करण्यासाठी आपण आदल्या रात्री बदाम, काजू, मनुके भिजत ठेवतो व दुसऱ्या दिवशी सकाळी ते खातो. खरतर आपल्या रोजच्या आहारात या हेल्दी ड्रायफ्रुटसचा समावेश करणे खूपच गरजेचे असते. ड्रायफ्रुटस हे नुसते चवीलाच चांगले नाही तर ते आरोग्यासाठीही लाभदायक असतात. ड्रायफ्रूट्स आपल्या शरीराला एनर्जी, प्रोटीन, व्हिटॅमिन सारखे पोषक घटक पुरवतात. ड्रायफ्रूट्सचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जसे की, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत, वजन कमी करण्यास उपयुक्त, पचनशक्ती मजबूत करण्याचं काम यांसारखे अनेक फायदे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने  मिळतात. बदाम, काजू, खजूर, अक्रोड, पिस्ता यांसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये अनेक पोषक तत्व असतात. 

ड्रायफ्रूट्सचं वैशिष्ट्य म्हणजे हे आपण नुसतेही खाऊ शकतो, तसेच यापासून अनेक पदार्थ देखील बनवू शकतो. आपण बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यासोबत ड्रायफ्रूट्सचे सेवन करतो. काहीवेळा कामाच्या घाईगडबडीत आपल्याकडे नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळीही  नसतो. अशावेळी आपण नाश्ता न करताच निघून जातो किंवा नाश्ता झाल्यावर ड्रायफ्रूट्स खायला विसरतो. अशावेळी, आपला त्या दिवशीचा ड्रायफ्रूट्सचा डेली डोस मिस होतो. आपला हा ड्रायफ्रूट्सचा डेली डोस मिस होऊ नये म्हणून आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स एकत्रित करुन त्यापासून झटपट खजूर पाक बनवू शकतो. एकाचवेळी एवढे सगळे ड्रायफ्रूट्स खाणे शक्य नसते किंवा तितका वेळीही नसतो म्हणून सगळ्या ड्रायफ्रूट्सचा वापर करुन आपण झक्कास खजूर पाक बनवू शकतो(How To Make Khajur Paak At Home).          

साहित्य :- 

१. तूप - १ टेबलस्पून 
२. काजू - १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले) 
३. बदाम -  १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)  
४. अक्रोड - १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)  
५. पिस्ता - १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)  
६. भोपळ्याच्या बिया - २ टेबलस्पून 
७. सूर्यफुलाच्या बिया - २ टेबलस्पून
८. खजूर - १, १/२ कप (बिया काढून घेतलेले)  

कृती :- 

१. सर्वप्रथम एका कढईमध्ये तूप घेऊन त्यात बारीक तुकडे करुन घेतलेले पिस्ता, बदाम, काजू ,अक्रोड, भोपळ्याच्या बिया, भोपळ्याच्या बिया हलक्याशा परतून घ्याव्यात. 
२. त्यानंतर कढईमध्ये थोडेसे तूप घेऊन त्यात बिया काढून घेतलेल्या खजुराचे लहान लहान तुकडे घालावेत. खजूर थोडेसे एकजीव होईपर्यंत हलकेच परतून घ्यावे. 

३. आता या खजुराच्या मिश्रणात परतून घेतलेले पिस्ता, बदाम, काजू ,अक्रोड, भोपळ्याच्या बिया, भोपळ्याच्या बिया यांचे बारीक तुकडे घालावेत. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स त्या खजुराच्या मिश्रणात एकजीव करुन घ्यावे. 
४. त्यानंतर हे मिश्रण एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावे. हे मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. मिश्रण थोडे गरम - गार असताना हाताला किंचीतसे तूप लावून याचे लाडू वळून घ्यावेत. जर आपल्याला या मिश्रणाचे लाडू बनवायचे नसल्यास, एका मोठ्या ताटाला थोडेसे तूप लावून त्यात हे मिश्रण ओतून घ्यावे आणि हे मिश्रण ताटात थापून घ्यावे, नंतर सुरीच्या मदतीने याच्या वड्या पाडाव्यात. 

आपले हाय प्रोटिन खजूर पाक खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: How To Make Khajur Paak At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.