आजारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता डॉक्टरांकडून साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. साखरेला पर्याय म्हणून गूळ, मध, फळं, खजूर या पदार्थांचे प्रमाण आहारात वाढवायला हवं. (Sugar less Mithai) काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर साखर न खाता खजूरापासून तयार केलेली कमी गोड पौष्टीक मिठाई खाल्ल्यास शरीराला कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही खजूर पाक हा इम्यूनिटी बुस्टर पदार्थ बनवू शकता. (No sugar no jaggery mittai)
साहित्य
२ पाकीटं खजूर
५० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम डिंक
५० ग्रॅम पिस्ता
२५ ग्रॅम काजू
२५ ग्रॅम आक्रोड
२ चमचे बेदाणे
1 चमचा सुर्यफुलाच्या बीया
1 चमचा तीळ
1 चमचा खसखस
1 चमचा वेलची जायफळ पूड
३ चमचे साजूक तूप.
कृती
१) सगळ्यात आधी ड्राय फ्रुट्स कापून जाडसर पेस्ट करून घ्या.
२) एका भांड्यात तूप गरम करून त्यात ड्रायफ्रुट्स एक एक करून परतवून घ्या. डिंक तळल्यानंतर कुस्करून घ्या
३) खसखस, मगज व सुर्यफुलाच्या बीया भाजून घेऊन सर्व मिक्स करुन घ्या.
४) ड्राय फ्रुट्स परतून घेतल्यानंतर, तुपात खजूर मऊ झाल्यानंतर वरील मिश्रण मिक्स करून गॅस बंद करा. यात तुम्ही वेलची आणि जायफळ पूड मिक्स करून घ्या.
५) तुपानं ग्रीस केलेल्या ताटात हे मिश्रण घाला आणि त्याच्या वड्या कापून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. तयार आहे पौष्टीक खजूर पाक.