गुजरातचे अनेक पदार्थ लोकप्रिय आहेत. जिलेबी, फाफडा यासह खमण ढोकळा आवर्जून खाल्ला जातो (Khaman Dhokla). ढोकळा २ प्रकारचे केले जातात. एक रव्याचा तर दुसरा डाळीचा केला जातो (Cooking Tips). रव्याचा पांढरा लवकर झटपट तयार होतो. तर डाळीचा पिवळा ढोकळा तयार करण्यासाठी बराच वेळ जातो. शिवाय घरी तयार करताना विकतसारखा तयार होत नाही.
हलवाईच्या दुकानात जाळीदार ढोकळा मिळतो (Gujarati Dish). पण घरी तयार करताना ढोकळा व्यवस्थित फुलत नाही. जर आपल्याला विकतसारखा ढोकळा तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा. मिक्सरच्या भांड्यात मिश्रण ते प्रेशर कुकरमध्ये ढोकळा वाफवून घेण्यापर्यंत, ढोकळा या पद्धतीने केल्यास झटपट आणि परफेक्ट तयार होईल(How to make Khaman Dhokla batter in mixi).
खमण ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य
बेसन
हळद
तेल
मीठ
साखर
रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, १ वाटीचे प्रमाण - पाहा परफेक्ट रेसिपी
हिरवी मिरची
आलं
लिंबाचा रस
पाणी
इनो
जिरं
मोहरी
कडीपत्ता
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात २ कप बेसन घ्या. त्यात एक चमचा हळद, एक चमचा तेल, चवीनुसार मीठ, एक चमचा साखर, २ हिरव्या मिरच्या, एक चमचा आलं, २ टेबलस्पून लिंबाचा रस आणि एक कप पाणी घालून, मिक्सरच्या भांड्यात साहित्य मिक्स करा.
लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक
तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्या. एका चाळणीला अॅल्युमिनियम फॉइल लावून कोट करा. त्यात बॅटर ओता. प्रेशर कुकरमध्ये थोडं पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. बॅटरमध्ये एक चमचा इनो घालून मिक्स करा, आणि बॅटर चाळणीमध्ये ओतून, चाळणी प्रेशर कुकरमध्ये ठेवा. प्रेशर कुकरचं झाकण लावण्यापूर्वी त्याची शिट्टी काढा. १५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर ढोकळा वाफवून घ्या. १५ मिनिटानंतर चाकूने ढोकळा शिजला आहे की नाही, हे चेक करा.
ढोकळा तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि सुरीने कट करा. फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिरवी मिरची, साखर आणि थोडं पाणी घालून तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून पसरवा. अशा प्रकारे आपला जाळीदार ढोकळा खाण्यासाठी रेडी.