हिवाळा सुरू झाला की घरोघरी डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, सुकामेव्याचे लाडू, उडीदाचे लाडू असे वेगवेगळे लाडू करण्याची तयारी सुरू होते. हे लाडू करत असताना त्यात गूळ, साखर असे पदार्थ शक्यतो वापरले जात नाहीत. त्याऐवजी खारीक पावडर, खजूर असे नैसर्गिक गोड पदार्थ वापरण्याचा अनेकींचा प्रयत्न असतो. म्हणूनच या लाडूंसाठी खारीक पावडर लागतेच. काही जणींना घरच्याघरी खारीक पावडर तयार करणं अवघड वाटतं. त्यामुळे त्या ती विकत आणतात. पण खारकेच्या जवळपास दुप्पट दराने खारीक पावडर मिळते (simple tricks to make dry dates powder at home). म्हणूनच विकतची खारीक पावडर घेण्यासाठी एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने खारीक पावडर कशी तयार करायची ते पाहा...(how to make kharik powder or dry dates powder at home?)
खारीक पावडर कशी तयार करावी?
घरच्याघरी एकदम सोप्या पद्धतीने खारीक पावडर कशी तयार करावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ Cooking ticket marathi या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.
मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी
खारीक पावडर करण्यासाठी सगळ्यात आधी बाजारातून विकत आणलेली खारीक एका ताटात पसरवून घ्या आणि ती २ तास उन्हात वाळू द्या. जर तुमच्याकडे तेवढं ऊन येत नसेल तर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई चांगली गरम झाली की मग त्यामध्ये खारीक टाकून ती ५ ते ६ मिनिटे भाजून घ्या.
यानंतर गॅस बंद करा आणि खारका थंड होऊ द्या. त्यानंतर त्या एखाद्या सुती पिशवीमध्ये टाका. पिशवीचं तोंड बंद करा आणि बत्त्याने किंवा हातोडीने हलक्या हाताने दाब देऊन खारका फोडा. साधारण ५ ते ६ मिनिटांत खारका फोडून होतील.
मार्गशीर्ष गुरुवार: देवीच्या पूजेसाठी चटकन करा आकर्षक सजावट! पूजेचा उत्साह वाढून प्रसन्न वाटेल
यानंतर फोडलेल्या खारकेतून बी बाजूला काढा आणि खारका कढईमध्ये टाकून तुपात पुन्हा एकदा ५ ते ६ मिनिटे परतून घ्या.
यानंतर खारीक थंड झाल्या की थोड्या थोड्या खारका मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर करून घ्या. या पद्धतीने केलेली खारकेची पावडर फ्रिजशिवायही १ महिना चांगली टिकते. फ्रिजमध्ये ठेवल्यास २ ते ३ महिने तिला काही होत नाही.