Lokmat Sakhi >Food > एक कप नेहमीच्या दुधाचा करा मस्त खरवस, इन्स्टंट खरवसाची सोपी रेसिपी

एक कप नेहमीच्या दुधाचा करा मस्त खरवस, इन्स्टंट खरवसाची सोपी रेसिपी

How To Make Kharvas | Steamed Milk Pudding चिकाचे दूध नाही मिळाले तरी खरवस करण्याची एक खास ट्रिक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 02:15 PM2023-08-23T14:15:26+5:302023-08-23T15:26:09+5:30

How To Make Kharvas | Steamed Milk Pudding चिकाचे दूध नाही मिळाले तरी खरवस करण्याची एक खास ट्रिक..

How To Make Kharvas | Steamed Milk Pudding | एक कप नेहमीच्या दुधाचा करा मस्त खरवस, इन्स्टंट खरवसाची सोपी रेसिपी

एक कप नेहमीच्या दुधाचा करा मस्त खरवस, इन्स्टंट खरवसाची सोपी रेसिपी

खरवस कोणाला नाही आवडत. पूर्वी आसपासच्या गोठ्यातील गाय, म्हैस जेव्हा विणार आहे, असं कळलं की, आपल्याला चिक मिळावा, यासाठी लोकांची फार गडबड उडायची. सगळ्यांचे डोळे गाय किंवा म्हशीच्या बाळंतपणाकडे लागायचे. परंतु, शहरात आपण चिक आणण्यासाठी दुधवाल्याला सांगतो. तो कधी तरी महिना, दोन महिन्यांनी चीक आणून देणार, मग आपण खरवस तयार करणार. तोपर्यंत आपली खरवस खाण्याची इच्छा हमखास कमी होऊन जायची.

काहींना फक्त गावी गेल्यावरच खरवस खायला मिळते. त्यामुळे चिकसाठी वाट बघण्यापेक्षा घरात इन्स्टंट खरवस तयार करून पाहा. इन्स्टंट खरवस झटपट तयार होते, व त्याची चव ओरिजिनल खरवस सारखीच लागते. त्यामुळे खरवस खाण्याची इच्छा मारू नका, दुधाचा इन्स्टंट खरवस तयार करा(How To Make Kharvas | Steamed Milk Pudding ).

इन्स्टंट खरवस करण्यासाठी लागणारं साहित्य

दही

कॉर्न फ्लोर

दूध

जागतिक वडापाव दिन : चमचमीत टेस्टी वडापावचे ८ प्रकार, सांगा तुम्हाला कोणता आवडतो?

अर्धा कप साखर

वेलची पूड

गुळ

तूप

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ चमचे घट्ट दही घ्या. त्यात अर्धा कप कॉर्न फ्लोर घाला. व व्हिस्करने साहित्य मिक्स करा. नंतर त्यात एक कप दूध, अर्धा कप गुळ, एक चमचा वेलची पावडर घालून साहित्य एकजीव करा. जोपर्यंत गुळ मिश्रणात विरघळत नाही, तोपर्यंत व्हिस्करने सतत ढवळत राहा.

दुसरीकडे एका स्टीलच्या भांड्याला, हाताने किंवा ब्रशने एक चमचा तूप लावून ग्रीस करा. चहाची गाळणी घ्या, त्यातून तयार दुधाचे मिश्रण गाळून भांड्यात ओतून घ्या. त्यावर जायफळ किसून घाला.

रक्षाबंधन विशेष : ना मैदा - ना खवा, अर्धा कप गव्हाच्या पीठाचे करा मस्त गुलाबजाम, रक्षाबंधन होईल स्पेशल

स्टीमरच्या भांड्यात पाणी उकळवण्यासाठी ठेवा, पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक स्टँड ठेवा. नंतर तयार खरवसाचं भांडं स्टीमरच्या स्टँडवर ठेवा. त्यावर झाकण ठेऊन ३० मिनिटांसाठी खरवस वाफवून घ्या. ३० मिनिटानंतर त्यात टूथपिक किंवा सुरीने खरवस शिजले आहे की नाही हे चेक करा. खरवस तयार झाल्यानंतर भांडं बाहेर काढा. भांडं थोडं गार झाल्यानंतर फ्रिजमध्ये २ तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवा. खरवस सेट झाल्यानंतर खरवसाचे चौकोणी  काप करा. अशा प्रकारे इन्स्टंट खरवस खाण्यासाठी रेडी.

Web Title: How To Make Kharvas | Steamed Milk Pudding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.