Lokmat Sakhi >Food > अर्धी वाटी सुकं खोबरं वापरून ५ मिनिटात करा चवदार चटणी; आठवडाभर टिकेल-सोपी रेसिपी

अर्धी वाटी सुकं खोबरं वापरून ५ मिनिटात करा चवदार चटणी; आठवडाभर टिकेल-सोपी रेसिपी

How to make khobryachi chutney : नारळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी नेहमीच खाल्ली जाते. (How to make khobryachi chutney) सध्या कैरीची चटणी अनेक घरांमध्ये बनवली जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 08:26 PM2023-06-04T20:26:29+5:302023-06-05T13:11:06+5:30

How to make khobryachi chutney : नारळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी नेहमीच खाल्ली जाते. (How to make khobryachi chutney) सध्या कैरीची चटणी अनेक घरांमध्ये बनवली जात आहेत.

How to make khobryachi chutney : Dry coconut chutney cooking tips coconut chutney recipe | अर्धी वाटी सुकं खोबरं वापरून ५ मिनिटात करा चवदार चटणी; आठवडाभर टिकेल-सोपी रेसिपी

अर्धी वाटी सुकं खोबरं वापरून ५ मिनिटात करा चवदार चटणी; आठवडाभर टिकेल-सोपी रेसिपी

जेवताना तोंडी लावणीसाठी चटणी, लोणचं असे पदार्थ असले की जेवणाची मजाच काही वेगळी असते. भारतीय खादय संस्कृतीत चटण्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. चटण्या ताटात असल्या की  साध्या जेवणाचाही रंगत वाढते आणि खाणाराही पोटभर खातो. (Dry Coconut Chutney Recipe) चटण्या बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही फक्त ५ मिनिटात हा पदार्थ  बनून तयार होतो.

नारळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी नेहमीच खाल्ली जाते. (How to make khobryachi chutney) सध्या कैरीची चटणी अनेक घरांमध्ये बनवली जात आहेत. अनेकजण सुक्या भाजीत वाटण नसल्यावरही या चटण्या वरून घालतात. जेणेकरूण जेवणाला अधिक चव येईल.  काही प्रकारच्या चटण्या  बनवण्यासाठी मिक्सरचीही गरज लागत नाही. खलबत्त्यात वाटून तुम्ही झणझणीच चटण्या बनवू शकता. 

खोबऱ्याची सुकी चटणी बनण्याचं साहित्य

सुकं खोबरं -१ वाटी

लसूण- ८ ते १० पाकळ्या

जीरं -आवडीनुसार

लाल तिखट- १ चमचा

दाण्याचं कुट - १ चमचा

मीठ - चवीनुसार

कृती

१) ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात सुक्या खोबऱ्याचे बारीक काप करून हे काप भाजून घ्या. 

२) नंतर कढईत जीरं गरम करून घ्या. जीरं गरम झालं की एका ताटात काढून घ्या. 

३) मिक्सरच्या भांड्यात जीर, खोबरं, लसूण, लाल तिखट, दाण्याचं कूट, मीठ घालून फिरवून घ्या. तयार आहे चविष्ट खोबऱ्याची चटणी.

खोबऱ्याची ओली चटणी कशी बनवायची?

१) मिक्सरच्या भांड्यात कच्चे खोबरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, दही आणि १/४ कप पाणी घालून बारीक वाटून घ्या. 

२) एका भांड्यात चटणी काढा, चटणी किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालता येईल. 

३) एका छोट्या कढईत तेल टाकून गरम करा. तेलात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर त्यात कढीपत्ता घाला, गॅस बंद करा. 

४) चटणीत मोहरीची फोडणी घालून मिक्स करा.नारळाची चटणी तयार आहे. चवदार खोबऱ्याची चटणी इडली, डोसा, वड्यासोबत खा.

Web Title: How to make khobryachi chutney : Dry coconut chutney cooking tips coconut chutney recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.