सिझन कोणताही असला तरी बाजारात कोथिंबीर पाहायला मिळतो. (Maharashtrian Kothimbir Vadi) वरणाला, भाजीला किंवा इतर कोणत्याही पदार्थांमध्ये कोथिंबीर घातला नसेल तर त्याची चव बिघडते.(How to Make Kothimbir Vadi) पदार्थाची चव वाढवण्यासाठी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह केली जाते. कोथिंबीरीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.(Kothimbir Vadi without Besan) कोथिंबीरीच्या बिया धणे म्हणून ओळखतात. ज्याचा आपण मसाल्यांमध्ये वापर करतो. अनेकदा बाजारात स्वस्त दरात कोथिंबीर मिळत असेल तर आपण तो जास्तीचा विकत घेतो. परंतु, व्यवस्थित साफ करुनही तो जास्त काळ टिकत नाही. आपणही जास्तीचा कोथिंबीर घरात आणला असेल तर त्याची वडी बनवू शकतो. (Traditional Kothimbir Vadi)
कोथिंबीरची वडी, मुंडके आपण खाल्लेच असेल. परंतु, अनेकदा ती बनवताना फसते. (Kothimbir Vadi Alternative to Besan) पिठाचे प्रमाण कधी जास्त होते किंवा पीठ कच्चे राहाते. बेसनाचे पीठ न वापरता आपण अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीरची वडी तयार करु शकतो. ही वडी बनवताना थापण्याची देखील गरज वाटणार नाही. अगदी कमी वेळात झटपट बनणारी कुरकुरीत-खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार होईल.
साहित्य
चिरलेली कोथिंबीर - २ वाटी
बाजरीचे पीठ - ३/४ वाटी
तांदळाचे पीठ - १/४ वाटी
हिरव्या मिरच्या - ४
लसूण पाकळ्या- ८ ते ९
जिरे - १ चमचा
ओवा -१ चमचा
तीळ - दीड चमचा
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - १ चमचा
हळद - १ चमचा
तेल - तळणासाठी
कृती
1. सर्वात आधी चिरलेली कोथिंबीरीमध्ये बाजरीचे आणि तांदाळचे पीठ घाला.
2. यानंतर त्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरे आणि ओव्याची पेस्ट करुन घाला. मिश्रण चांगले एकजीव करा.
3. आता यात तीळ, मीठ, लाल तिखट आणि हळद घालून पीठ चांगले मळून घ्या. पिठाचे दोन उभ्या आकाराचे गोळे तयार करा.
4. कढईमध्ये पाणी उकळायला ठेवा. चाळणीला तेल लावून पीठाचे गोळे झाकून ३० मिनिटे वाफवून घ्या.
5. व्यवस्थित शिजल्यानंतर पीठाचे सुरीने काप करा. कढईत तेल गरम करुन कुरकुरीत- खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार करा.