Join us  

ना बेसन-ना पाण्याचा एकही थेंब, पाहा कुरकुरीत कोथिंबीर वडी करण्याची नवी पद्धत-जिभेची चव वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2023 11:17 AM

How to make Kothimbir vadi without Besan : बेसन न घालता कधी कोथिंबीर वडी करून पाहिली आहे एका?

हिवाळा (Winter Season) सुरु झाला की सर्वत्र पालेभाज्या स्वस्त दारात मिळतात. सध्या कोथिंबीरचा सिझन सुरु आहे. जर स्वस्त कोथिंबीर मिळाली तर, आपण २ जुडी तरी घरी आणून ठेवतो. काही जण त्याचा वापर डिश सजवण्यासाठी किंवा कोथिंबीर वडी (Kothimbir vadi) तयार करण्यासाठी करतात. कोथिंबीर वडी करण्याची पद्धत बहुंतांश महिलांना ठाऊक आहे. काही जण वाफवून वडी तयार करतात, तर काहीजण त्याची भजी तयार करतात. त्यात बेसनाचा (Besan) वापर हमखास होतो. पण कोथिंबीर वडी खाण्याची इच्छा झालीस आणि बेसन घरात नसेल तर?

काही जणांना बेसन पचत नाही, ज्यामुळे ते भजी, वडे किंवा वडी खाणं टाळतात (Cooking Tips). जर आपल्याला बेसनाचा वापर न करता कोथिंबीर वडी तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. बेसनाचा वापर न करता कोथिंबीर वडी कशी तयार करायची पाहूयात(How to make Kothimbir vadi without Besan).

बेसन न घालता कुरकुरीत कोथिंबीर वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

कोथिंबीर

थालीपिठाची भाजणी

लसूण

हिरवी मिरची

ओवा

जिरं

धणे पूड

हळद

लाल तिखट

पातेल्यात मऊ-मोकळा भात झटपट शिजवण्याची १ सोपी ट्रिक, प्रेशर कुकरमध्ये भात लावण्याची गरजच नाही

मीठ

पांढरे तीळ

तेल

कृती

सर्वप्रथम, खलबत्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा ओवा, एक चमचा जिरं घालून ठेचून घ्या. तयार वाटण एका बाऊलमध्ये काढून घ्या. मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या, नंतर त्यात बेसनाऐवजी थालीपीठाची भाजणी, हिरवी मिरचीचा ठेचा, एक चमचा धणे पूड, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक चमचा पांढरे तीळ घालून हाताने मिक्स करा. साहित्य  मिक्स करत असताना त्यात पाण्याचा एकही थेंबाचा वापर करू नका, व हाताने दाब देत पीठ मळून घ्या.

हिवाळ्यात गरमागरम सिंधी कढी खाऊन तर पाहा, तोंडाला चव येईल असा भन्नाट पदार्थ

पीठ मळून झाल्यानंतर त्याचे लांबट आकाराचे रोल तयार करून घ्या. नंतर त्यावर पांढरे तीळ लावून चिटकवा. स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. चाळणीला थोडे तेल लावून हाताने पसरवा. त्यात रोल ठेऊन प्लेट स्टीमरमध्ये ठेवा. १५ मिनिटानंतर वडी वाफेवर शिजली आहे की नाही हे सुरीने चेक करा. वडी जर शिजली असेल तर, प्लेट स्टीमरमधून बाहेर काढा. थंड झाल्यानंतर वडीचे काप करा. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडी सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे बेसन न घालता कुरकुरीत कोथिंबीर वडी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स