Lokmat Sakhi >Food > दाबेलीत भरायचे सारण जमत नाही? घ्या कच्छी दाबेली करण्याची रेसिपी - सारण जमेल परफेक्ट

दाबेलीत भरायचे सारण जमत नाही? घ्या कच्छी दाबेली करण्याची रेसिपी - सारण जमेल परफेक्ट

How to make Kutchi Dabeli : कच्छी दाबेली खाण्यासाठी आता स्टॉलवर जाण्याची गरज नाही, घरीच करता येईल लज्जतदार कच्छी दाबेली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 01:38 PM2024-02-12T13:38:47+5:302024-02-12T13:39:52+5:30

How to make Kutchi Dabeli : कच्छी दाबेली खाण्यासाठी आता स्टॉलवर जाण्याची गरज नाही, घरीच करता येईल लज्जतदार कच्छी दाबेली..

How to make Kutchi Dabeli | दाबेलीत भरायचे सारण जमत नाही? घ्या कच्छी दाबेली करण्याची रेसिपी - सारण जमेल परफेक्ट

दाबेलीत भरायचे सारण जमत नाही? घ्या कच्छी दाबेली करण्याची रेसिपी - सारण जमेल परफेक्ट

महाराष्ट्रात स्ट्रीट फूड खाण्याचे शौकीन सर्वत्र पाहायला मिळतात. वडा पाव, समोसा, भेळ यासह कच्छी दाबेली देखील आवडीने खाल्ली जाते. वडा पावप्रमाणे दिसणारी कच्छी दाबेली खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. मुंबई यासह गुजराथच्या खाऊच्या गाड्यांवर हा स्ट्रीट फूड हमखास मिळतो (Cooking Tips). पोटाला हल्की - खिश्याला परवडणारी कच्छी दाबेली खाल्ल्याने सायंकाळची छोटी भूक भागते.

गरमागरम पाव बटरमध्ये भाजून, त्याच्या आत दाबेलीची चविष्ट भाजी भरली जाते. शिवाय त्यावर शेव भुरभुरून, सोबत भाजलेले शेंगदाणे दिले जाते (Cooking Tips). पण घरी तयार केल्यास दाबेलीची भाजी परफेक्ट जमत नाही. जर आपल्याला आंबट-गोड चवीची भाजी घरी तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(How to make Kutchi Dabeli).

कच्छी दाबेलीची भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

तेल

हळद

लाल तिखट

दाबेली मसाला

ना डाळ-तांदूळ, ना चटणी-सांबार; कपभर रव्याची करा मिनी मसाला इडली, इन्स्टंट रेसिपी

पाणी

चिंचेची चटणी

जिरे पूड

धणे पूड

मीठ

साखर

सुकं खोबरं

कोथिंबीर

डाळींबाचे दाणे

लसणाची चटणी

कांदा

भाजलेले शेंगदाणे

कोथिंबीर

बटर

कृती

सर्वप्रथम, एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, ३ टेबलस्पून दाबेली मसाला आणि कपभर पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात उकडलेले बटाटे,  ५ ते ६ चमचे चिंचेची चटणी, अर्धा चमचा जिरे पूड, एक टेबलस्पून धणे पूड, चवीनुसार मीठ, एक चमचा साखर आणि कपभर पाणी घालून साहित्य एकजीव करा.

घरातला लसूण संपला? ऐनवेळी लसणाऐवजी वापरा ३ गोष्टी, पदार्थ होईल रुचकर

साहित्य एकजीव केल्यानंतर चमच्याने सतत ढवळत राहा, जोपर्यंत पाणी आटत नाही. भाजीला घट्टपणा आल्यानंतर एका ताटामध्ये काढून पसरवून घ्या. अशा प्रकारे दाबेलीची भाजी रेडी. त्यावर किसलेलं सुकं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे पसरवा.

आता पावाच्या मधोमध भागात एक चमचा चिंचेची चटणी आणि लसणाची ओली चटणी लावून पसरवा. त्यात चमचाभर तयार दाबेलीची भाजी भरा. पाव बंद करून चहुबाजूने कांदा, भाजलेले शेंगदाणे आणि शेव चिटकवा. पॅनवर बटरचा एक तुकडा ठेवा. बटर वितळल्यानंतर त्यावर पाव ठेवून, दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्या. अशा प्रकारे गुजराथी स्टाईल कच्छी दाबेली खाण्यासाठी रेडी.

Web Title: How to make Kutchi Dabeli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.