Lokmat Sakhi >Food > आंबटगोड- चटपटीत लब्दू किंवा गुळबोरं आवडतात? बघा लहानपणी शाळेसमोर मिळणाऱ्या 'त्या' बोरांची रेसिपी

आंबटगोड- चटपटीत लब्दू किंवा गुळबोरं आवडतात? बघा लहानपणी शाळेसमोर मिळणाऱ्या 'त्या' बोरांची रेसिपी

How To Make Labdu From Ber: गुळबोरं किंवा लब्दू हा काही वर्षांपुर्वी बहुतांश शाळांसमोर हमखास मिळणारा एक चटकदार पदार्थ.. बघा त्याचीच ही खास रेसिपी.. (How to make labdu from dried bor?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 12:14 PM2024-02-24T12:14:56+5:302024-02-24T12:15:43+5:30

How To Make Labdu From Ber: गुळबोरं किंवा लब्दू हा काही वर्षांपुर्वी बहुतांश शाळांसमोर हमखास मिळणारा एक चटकदार पदार्थ.. बघा त्याचीच ही खास रेसिपी.. (How to make labdu from dried bor?)

How to make labdu from ber, god bor recipe, mithe ber or gul ber recipe in marathi, How to make labdu from dried bor? | आंबटगोड- चटपटीत लब्दू किंवा गुळबोरं आवडतात? बघा लहानपणी शाळेसमोर मिळणाऱ्या 'त्या' बोरांची रेसिपी

आंबटगोड- चटपटीत लब्दू किंवा गुळबोरं आवडतात? बघा लहानपणी शाळेसमोर मिळणाऱ्या 'त्या' बोरांची रेसिपी

Highlights ज्यांनी आतापर्यंत हा पदार्थ एकदाही खाल्लेला नाही त्यांनी रेसिपी पाहून करून बघा

काही काही गोष्टी किंवा पदार्थ असे असतात, जे पाहिले की आपण आपोआप नॉस्टॅल्जिक मूडमध्ये चालले जातो. शाळेसमोर मिळणारी गुळबोर हा त्यातलाच एक प्रकार. काही ठिकाणी ही आंबटगोड- चटकदार बोरं लब्दू म्हणूनही ओळखली जातात. आता २५- ३० वर्षे वयात असणाऱ्या प्रत्येकाने शाळेत असताना कधी ना कधी ही बोरं खाऊन पाहिली असणारच. काही जणांचा तर हा अतिशय आवडता पदार्थ (How to make labdu from ber). ज्यांनी आतापर्यंत हा पदार्थ एकदाही खाल्लेला नाही त्यांनी रेसिपी पाहून करून बघा (mithe ber or gul ber recipe in marathi).. त्याकाळी  शाळेसमोर अवघ्या १- २ रुपयांमध्ये मिळणारा हा पदार्थ घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते पाहूया..  (How to make labdu from dried bor?)

 

गुळबोरं किंवा लब्दू तयार करण्याची रेसिपी. 

संक्रांतीपासून बोरं मिळायला सुरुवात होतात. आता पिकलेल्या बोरांपेक्षा अशी वाळलेली बोरं बाजारात अधिक मिळतात. त्यामुळे तुम्हाला गुळबोरं किंवा लब्दू करून ठेवायची असतील, तर आता त्यासाठी मोजकेच काही दिवस राहिले आहेत. कारण त्यानंतर बाजारात अशी वाळलेली बोरं मिळणार नाहीत. 

कशाला हवा विकतचा लिप बाम? गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच करा नॅचरल लिप कलर- स्वस्तात मस्त

गुळबोरं कशी तयार करायची याची रेसिपी chavdar_ani_chatakdar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

सगळ्यात आधी तर वाळलेली बोरं चांंगली निवडून घ्या. ज्या बोरांना छिद्र पडलेली असतात, ती बोरं वापरू नका. कारण ती बोरं किडकी असतात. बोरं स्वच्छ धुवून घ्या.

 

यानंतर कढईमध्ये पाणी घालून ही बोरं थोडी शिजवून घ्या.

मधुमालतीची काळजी घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी- उन्हाळ्यात फुलांनी बहरून जाईल वेल

बोरं शिजली की ती पाण्यातून बाजुला काढून घ्या. कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात शिजवलेली बोरं घाला. थोडा गूळ घाला. चवीनुसार थोडं मीठ आणि थोडं लाल तिखटही टाका आणि गुळाचा पाक होईपर्यंत मिश्रण गरम होऊ द्या.

गुळाचा पाक झाला की त्या पाकातून बोरं बाजूला काढून घ्या. खूप घट्ट पाक नको. कारण त्यामुळे बोरं कडक किंवा वातड होऊ शकतात. 


 

Web Title: How to make labdu from ber, god bor recipe, mithe ber or gul ber recipe in marathi, How to make labdu from dried bor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.