चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी काहीतरी खमंग, चविष्ट खावंस वाटतं. फरसाण, शेव बाहेरून आणून ठेवलं तर काही दिवसांनी ते नरम पडत आणि चव बदलू लागते. याशिवाय बाहरचे पदार्थ कोणत्या तेलात तळलेले असतात याची कल्पना नसते. (Lasun Chivda Recipe)
अनेकांना जरा तेलकट खाल्लं की खोकला जाणवतो. घरीच टी टाईम स्नॅक्स बनवण्याची सोपी रेसेपी या लेखात पाहूया. लसूण चिवडा खायला चविष्ट तितकाच करायलाही सोपा आहे. एक घास खाल्ला की चिवड्याची पूर्ण डिश कधी संपते कळतंच नाही. (How to make lasun chivda at home)
साहित्य
बेसन पीठ 400 ग्रॅम
तांदूळ पावडर 50 ग्रॅम
हळद पावडर
मीठ
पाणी
तेल
लसूण
कढीपत्ता
काश्मिरी लाल मिरची पावडर २ चमचे
हिंग
मीठ
कृती
१) सगळ्या आधी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, मीठ, हळद घालून एकत्र करून मळून घ्या.
२) मळलेलं पीठ साच्यात घालून कुरडईप्रमाणे शेव तळून घ्या. त्यानंतर त्यात पिठाच्या लहान बुंदी तळून घ्या.
३) त्याच तेलात लसूण, शेंगदाणे आणि कढीपत्ता तळून घ्या.
४) एका भांड्यात तळलेली शेव घालून बारीक चुरा करा, त्यात शेंगदाणे, कढीपत्ता, मीठ, मसाले घालून एकत्र करून घ्या.
५) तयार आहे कुरकुरीत लसूण चिवडा. हा चिवडा हवाबंद डब्यात तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता.