Join us  

लसूण आणि लाल मिरच्यांची झणझणीत चटणी, तोंडाला येईल चव- जेवणाची वाढेल रंगत, बघा ही झटपट रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 3:16 PM

Food And Recipe: इतर चटण्यांपेक्षा या चटणीची रेसिपी वेगळी आहे. कारण आपण यात लसूण भाजून घालणार आहोत. त्यामुळे चटणीचा खमंगपणा आणखीनच वाढतो (How to make Lasun/ Garlic chutney).

ठळक मुद्देजेवणात तोंडी लावायला तर ती घ्याच, पण कधी कधी भाजीमध्ये मसाला म्हणूनही टाकून बघा. भाजीला खमंग चव येईल.

कधी कधी तोंडाला चवच नसते. रोजचं एकसुरी जेवण नकोसं वाटतं. वरण आणि भाजीला त्यांची चव असते. पण तरीही जेवणात हवी तशी मजा येत नाही, असं आपलं बऱ्याचदा होतं. अशावेळी तोंडी लावायला एखादी मस्त झणझणीत चटणी किंवा चटकदार लोणचं हवं असतं. म्हणूनच ही एक चटणी (spicy Lasun/ Garlic chutney) घरात कायम करून ठेवा. जेवणात तोंडी लावायला तर ती घ्याच, पण कधी कधी भाजीमध्ये मसाला म्हणूनही टाकून बघा. भाजीला खमंग चव येईल. ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या cookingwithreshu_ या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

 

कशी करायची लसणाची खमंग चटणी?साहित्य१. १०० ग्रॅम लसूण म्हणजे साधारणपणे ६ ते ७ अख्खे लसूण

२. २० ते ३० ग्रॅम सुक्या लाल मिरच्या. तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही मिरच्यांचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. 

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला असतोच, पण त्यासोबत वापरा हे २ पदार्थ आणि कमाल बघा

३. बडिशेप, जिरे आणि मोहरी प्रत्येकी एकेक टेबलस्पून

४. १ ते दिड टेबलस्पून तेल

५. २ टेबलस्पून लिंबाचा रस

६. चवीनुसार मीठ

 

कशी करायची चटणी?१. सगळ्यात आधी तर गॅसवर जाळी ठेवा. त्या जाळीवर अख्खे लसूण ठेवा आणि ते त्याच्या टरफलांसहीत भाजून घ्या. वरतून काळपट रंग आला आणि भाजलेल्या लसूणचा सुगंध येऊ लागला की गॅस बंद करावा. आता भाजलेले लसूण काही वेळ तसेच ठेवा आणि थंड होऊ द्या.

दिवाळीच्या खर्चाचं टेन्शन आलं? बजेट कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ४ गोष्टी कटाक्षाने पाळा..

२. एका कढईमध्ये जिरे, मोहरी आणि बडिशेप टाकून भाजून घ्या. हे तिन्ही पदार्थ भाजून झाले की त्यात लाल मिरच्या टाका आणि त्या ही मंद आचेवर भाजून घ्या.

३. वरील सगळे पदार्थ थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. भाजलेल्या लसूणाच्या पाकळ्याही सोलून टाका. चवीनुसार मीठ घाला. तेल घाला आणि हे सगळे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. 

४. या चटणीत लिंबाचा रस टाका आणि सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून काचेच्या बरणीत भरून ठेवा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.