दुधी भोपळा पाहून अनेक जण नाक मुरडतात. कारण त्यांना त्याची भाजी अजिबात आवडत नाही. भाजी आवडत नाही म्हणून अनेकजणी मग दुधी भोपळ्याचे पराठे करून मुलांना किंवा घरच्यांना खायला देतात. पण ते ही अनेक जण आवडीने खात नाहीत. म्हणूनच आता भाजी किंवा पराठे आवडत नसतील तर दुधी भोपळ्याचा भात करून पाहा. लौकी चावल म्हणून ही रेसिपी बिहारमध्ये प्रसिद्ध आहे (how to make lauki chawal). हा अस्सल बिहारी पदार्थ कसा करायचा, याची रेसिपी नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (Neena Gupta's Recipe Of Lauki Rice)
लौकी राईस किंवा दुधी भोपळ्याचा भात रेसिपी
साहित्य
१ वाटी तांदूळ
१ मध्यम आकाराचा किसलेला भोपळा
१ चमचा तूप
आलिया भटने नववीत असताना पहिल्यांदा नेसली साडी आणि झाली 'अशी' फजिती.... व्हिडिओ व्हायरल
१ चमचा तेल
१ टीस्पून मोहरी आणि जिरे
लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या
अक्षयकुमारला खूप आवडतो 'हा' सुपरहेल्दी पदार्थ, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम, बघा रेसिपी
१ बारीक चिरलेली हिरवीमिरची
८ ते १० कडिपत्त्याची पानं
हिंग आणि चिमूटभर हळद
चवीनुसार मीठ
कृती
१. सगळ्यात आधी दुधी भोपळ्याची सालं काढून तो किसून घ्या. आणि तांदूळ अर्धा तास भिजत घाला.
२. एका कढईमध्ये तूप टाकून दुधी भोपळ्याचा किस परतून घ्या. तो हलकासा परतून झाला की त्यामध्ये भिजवलेले तांदूळ आणि तांदूळ शिजविण्यासाठी लागेल एवढं पाणी आणि चवीनुसार मीठ टाका.
झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या महिलेची व्हायरल गोष्ट, ती असं करते कारण..
३. आता कढईमध्ये भात शिजला की एका दुसऱ्या लहान कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्त्याची पानं, लसूण, मिरची टाकून फोडणी करून घ्या. आता ही फोडणी शिजवलेल्या भातावर टाका आणि सगळा भात एकदा व्यवस्थित हलवून घ्या.. गरमागरम लौकी राईस तयार. लहान मुलांसकट घरातल्या मोठ्या मंडळींनाही आवडेल हा पौष्टिक मेन्यू...