Join us  

मिठाईच्या दुकानात मिळते तशी भरपूर लेअर्सची खस्ता करंजी घरी करायचीय? मग ही सोपी ट्रिक पाहाच, करंजी टिकेल महिनाभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 12:22 PM

how to make layered karanji recipe : करंजी तळताना ना फुटणार, ना सारण बिघडणार, अचूक साहित्यांचा वापर करून करा भरपूर लेअर्सची खस्ता करंजी

आली आली दिवाळी आली, फराळ करण्याची वेळ झाली. आता काही दिवसांवर रोषणाईचा सण म्हणजेच दिवाळी येऊन ठेपली आहे. प्रत्येक घरात दिवाळीची पूर्व तयारी सुरु आहे. कोणाकडे साफसफाई तर कोणी फराळ करण्यात बिझी आहे. करंजी, चिवडा, चकली, शंकरपाळी, लाडू हे पदार्थ आवर्जून केले जातात. अनेकांना फराळामध्ये करंजी हा पदार्थ आवडतो. खोबरं, मैदा, ड्रायफ्रुट्सचा वापर करून करंजी तयार केली जाते.

करंजी तयार करणं खरंतर वेळखाऊ काम आहे. पण पूर्वतयारी केल्यास करंजी तयार करायला अधिक वेळ लागत नाही. शिवाय करंजीच्या पारीवर आपण विविध डिझाईन तयार करू शकता. स्वीटच्या दुकानात आपण पाहिलंच असेल की, करंजीवर लेअर्स असतात, पण हे लेअर्स कसे तयार करायचे? हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग, नेहमीची करंजी सोडा, यंदाच्या दिवाळीत लेअर्सची खुसखुशीत करंजी तयार करा(how to make layered karanji recipe).

सारण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

खसखस

तीळ

सुकामेवा

मनुके

तूप

रवा

खोबरं

वेलची पूड

कपभर गुळ-शेंगदाण्याचा करा पौष्टिक लाडू ५ मिनिटांत, हिवाळ्यात रोज सकाळी फक्त १ लाडू खाऊन तर पाहा

जायफळ पूड

पिठीसाखर

मीठ

कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक चमचा खसखस, एक चमचा तीळ घालून मंद आचेवर भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला सुकामेवा आणि मनुके घालून भाजून घ्या. साहित्य भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच कढईत एक चमचा तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात पाव कप रवा घाला.

तुपात रवा भाजून घ्या. रवा भाजून घेल्यानंतर त्यात दोन कप किसलेलं खोबरं घाला, व भाजून घ्या. साहित्य भाजून घेतल्यानंतर परातीत पसरवा. जेणेकरून रवा-खोबरं थंड होईल. रवा-खोबरं थंड झाल्यानंतर त्यात भाजलेलं सुका मेव्याचं मिश्रण, एक चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड, अर्धा कप पिठीसाखर, चवीनुसार मीठ घालून साहित्य हाताने मिक्स करा. अशा प्रकारे करंजीचं आतलं सारण रेडी.

कणिक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

मैदा

रवा

मीठ

तूप

तांदुळाचं पीठ

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये एक कप मैदा घ्या. त्यात २ चमचा रवा, चवीनुसार मीठ, एक चमचा गरम तूप घालून चमच्याने एकजीव करा. नंतर गरजेनुसार पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या. नंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. करंजीची पारी खुसखुशीत तयार व्हावी यासाठी साठा तयार करून घ्या. यासाठी एका वाटीत दीड चमचे तांदळाचं पीठ, एक चमचा तूप घालून मिक्स करा. जोपर्यंत त्याला क्रिमी टेक्चर येत नाही, तोपर्यंत फेटून घ्या.

अशा पद्धतीने तयार करा भरपूर लेअर्सची खस्ता करंजी

१० मिनिटानंतर कणकेचे मोठे गोळे तयार करा. चपाती तयार करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे गोळे त्यार करतो त्याचप्रमाणे मोठे गोळे तयार करा, व कणकेची पातळ पोळी लाटून घ्या. ४ पोळ्या लाटून झाल्यानंतर एका प्लेटवर एक पोळी ठेवा. त्यावर अर्धा चमचा साठा घालून हाताने पसरवा, त्यावर दुसरी पोळी ठेऊन पुन्हा त्यावर अर्धा चमचा साठा हाताने लावून पसरवा. अशा पद्धतीने एकावर एक ४ पोळ्यांवर साठा लावून झाल्यानंतर हाताने अलगद कडे दाबून घ्या. जेणेकरून साठा बाहेर येणार नाही.

छोटा भीम खातो ते टूनटून मावशीचे लाडू आता तुम्हीही करा घरीच, पाहा मस्त सोपी झटपट रेसिपी

नंतर पातळ रोल तयार करा. रोल तयार केल्यानंतर कणिक अलगदपणे फिरवून ताणून घ्या, व सुरीने त्याचे छोटे-छोटे काप करा. छोटा गोळा घेऊन पुऱ्याच्या आकाराची पोळी लाटून घ्या. नंतर त्यात चमच्याने सारण भरून करंजीचा आकार द्या.

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात करंजी अलगदपणे सोडून दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्या. करंजी तळून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर पसरवून ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघेल. करंजी थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशाप्रकारे भरपूर लेअर्सची खुसखुशीत करंजी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स