आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळच्या नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम पराठे खायला आवडतात. पराठा हा असा पदार्थ आहे की जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे नाश्त्याला किंवा जेवणाला बनवतो. हे गरमागरम पराठे नारळाच्या चटणीसोबत किंवा दही, सॉससोबत खाण्यासाठी चांगले लागतात. आतापर्यंत आपण नाश्त्याला आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा असे अनेक पराठ्यांचे प्रकार आपण खाल्लेच असतील. काहीवेळा घरी काही भाजी नसली किंवा काही वेगळं खावंसं वाटलं तर आपण झटपट बनून तयार होणारा पराठा लगेच बनवतो.
काही पराठयांचें प्रकार असे असतात की जे बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटत. चपाती सारखे गव्हाचे कणिक मळून त्याच्या आत आपल्याला हवे तसे भाज्यांचे स्टफिंग भरून पौष्टिक पराठा बनवता येतो. काहीवेळा या पराठ्यांमध्ये कोणत्याही भाजीचे स्टफिंग नसले तरीही आपण फक्त घरात उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांचा वापर करून देखील चटकन मसालेदार पराठा बनवू शकतो. सकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी मसालेदार पराठा कसा बनवायचा याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Layered Wheat Masala Paratha At Home).
साहित्य : -
१. गव्हाचे पीठ - ३ कप
२. तेल - २ ते ३ टेबलस्पून
३. जिरे पावडर - १ टेबलस्पून
४. धणे पावडर - १ टेबलस्पून
५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
६. बारीक चिरलेली कोथिंबीर - १ टेबलस्पून
७. काळे तीळ - १ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार
नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट....
१ कपभर रव्याच्या ‘सालपापड्या’, छोटीशी पापडी हातभर फुलते- पारंपरिक पापडीची भारी रेसिपी...
कृती :-
१. सर्वप्रथम, चपातीसाठी जसे कणिक मळून घेतो तसे कणिक मळून घ्यावे.
२. त्याचे छोटे - छोटे गोळे करून घ्यावेत.
३. आता कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याची नेहमीप्रमाणे चपाती लाटून घेतो तशी चपाती लाटून घ्यावी.
४. त्यानंतर या लाटलेल्या चपातीच्या बरोबर मधोमध प्रत्येकी एक टेबलस्पून तेल, जिरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट मसाला घालावा सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी.
दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...
५. आता हे सगळे मिश्रण एका चमच्याच्या मदतीने संपूर्ण पराठ्यावर पसरवून घ्यावे.
६. आता या पराठ्याच्या मध्यभागापासून खालच्या बाजूने सुरीने एक उभा कट द्यावा (व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे)
७. त्यानंतर ही चपाती गोल गोल गुंडाळत त्याचा पुन्हा एकदा छोटा गोळा तयार करून घ्यावा, आता या तयार गोळ्याचा एक पराठा लाटून घ्यावा.
८. पराठा लाटून झाल्यावर त्यावर थोडेसे काळे तीळ भुरभुरवून ते हातांनी दाब देऊन पराठ्याला चिकटवून घ्यावेत.
९. एका गरम पॅनमध्ये आवडीनुसार बटर किंवा तेल सोडून त्यावर हा मसाला पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा.
गरमागरम मसाला पराठा खाण्यासाठी तयार आहे. हा मसाला पराठा सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.