Join us  

शिळा भात खायचा नाही, फोडणीच्या भाताचा कंटाळा आला? करा खमंग झटपट ‘भात वडा’!-चवीला जबरदस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 1:49 PM

How To Make leftover Rice Vada : भात उरला की गारगुच्च भात खावासाच वाटत नाही, त्याच भाताचा हा चविष्ट पदार्थ- नाश्ता करा पोटभर

भात हा आपल्या रोजच्या जेवणातील मुख्य प्रकार आहे. जेवणात आपण कितीही भाकरी किंवा चपाती खाल्ली तरीही भात खाल्ल्याशिवाय आपले जेवण पूर्ण झाले असे वाटत नाही. तांदुळ शिजल्यानंतर त्याचा भात तयार होतो. या पांढऱ्याशुभ्र भाताचे असंख्य प्रकार आपण बनवून खातो. भातापासून आपण पुलाव भात, तांदुळाची खीर, तांदुळाचे पापड, तांदुळाची भाकरी असे अनेक पदार्थ बनवून खातो. बरेचदा आपण जेवणात भरपूर प्रमाणात भात बनवतो. भात हा डाळ, आमटी, वरण यांसारख्या अनेक पदार्थांसोबत खाल्ला जातो. 

काही घरांमध्ये रोजच्या जेवणाच्या ताटात भात हा लागतोच. भाताशिवाय काही लोकांना आपले जेवण पूर्ण झाले आहे असे वाटतच नाही. त्यामुळे रोजच्या जेवणात भाताला खूप महत्व असते. भात खाऊन आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते. काहीवेळा आपण केलेला हा भात भरपूर प्रमाणात उरतो. मग अशा या शिळ्या भाताचे नेमकं करायचं काय ? असा प्रश्न आपल्याला पडतो. हा शिळा भात आपण काहीवेळा फेकून देतो किंवा काहीवेळा या शिळ्या भाताचे विविध पदार्थ बनवून खातो. शक्यतो आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरात शिळा भात (leftover Rice) उरला की त्याला खमंग फोडणी देऊन त्याचा फोडणीचा भात तयार केला जातो. उरलेल्या शिळ्या भाताचा काही पदार्थ करायचा म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फोडणीचा भाताचं आठवतो. या पांढऱ्याशुभ्र भाताला खमंग मिरची किंवा लाल तिखटाची फोडणी देऊन फोडणीचा भात तयार केला जातो. परंतु काहीवेळा हा फोडणीचा भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो, अशावेळी आपण या उरलेल्या शिळ्या भातापासून चटकदार राईस वडा झटपट घरच्या घरी बनवू शकतो(How To Make leftover Rice Vada).    

साहित्य :- 

१. उरलेला भात - १/२ कप २. बेसन - २ टेबलस्पून ३. गव्हाचे पीठ - २ टेबलस्पून ४. मक्याचे पीठ - ३ टेबलस्पून ५. तांदुळाचे पीठ - ३ टेबलस्पून६. बाजरीचे पीठ - ४ टेबलस्पून ७. जिरे पावडर - २ टेबलस्पून ८. बारीक चिरलेली कोथिंबीर - ३ टेबलस्पून ९. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून १०. धणे पावडर - १ टेबलस्पून ११. मीठ - चवीनुसार १२. तेल - ५ ते ६ टेबलस्पून १३. पाणी - गरजेनुसार 

काही केल्या इडल्या फुगून येत नाहीत ? वापरा झटपट सोप्या टिप्स... इडली फुगेल पुरीसारखी टम्म...

नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट....

कृती :- 

१. सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये उरलेला शिळा भात घ्यावा. हा भात हातांनी किंवा मॅशरच्या मदतीने कुस्करून घ्यावा. २. आता या मॅश केलेल्या भातात बेसन, गव्हाचे पीठ, मक्याचे पीठ, तांदुळाचे पीठ, बाजरीचे पीठ घालून घ्यावे. ३. त्यानंतर या तयार मिश्रणात सगळ्या प्रकारचे मसाले घालून घ्यावेत. तयार मिश्रणात जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, धणे पावडर, गरजेनुसार मीठ घालावेत.  ४. आता या तयार झालेल्या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालूंन त्याचे घट्टसर पीठ मळून घ्यावे. 

हातही न लावता अगदी झटपट लसूण सोलण्याच्या ४ ट्रिक्स, किलोभर लसूणही सोलून होईल झटपट...

भरपूर पाणी असलेले शहाळे कसे ओळखायचे? ५ टिप्स - उन्हाळ्यात प्या शहाळ्याचे गोड पाणी...

५. पीठ मळून घेतल्यानंतर त्यावर थोडेसे तेल शिंपडून परत एकदा पीठ मळून घ्यावे. ६. पीठ मळून घेतल्यानंतर त्याचे छोटे - छोटे गोळे करून घ्यावेत. ७. आता एक बटर पेपर अंथरून घ्यावा. त्यानंतर हाताला थोडेसे तेल लावून पिठाचा एक गोळा घेऊन तो हातांनी थापून घ्यावा. थापून त्याला पुरीसारखा गोल आकार द्यावा. ८. आता एका कढईमध्ये तेल तापवून त्यात हे वडे दोन्ही बाजुंनी खरपूस तळून घ्यावेत. 

उरलेल्या शिळ्या भातापासून तयार केलेले वडे खाण्यासाठी तयार आहेत. हे गरमागरम वडे सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :अन्नपाककृती