जेवणात खिचडी, डाळ भात अगदी रोज खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. उरलेल्या भातापासून तुम्ही फोडणीचा भात अनेकदा ट्राय केला असेल. पांढऱ्या तांदळाचा लेमन राईस खायला अगदी रूचकर, चविष्ट लागतो.(How to Make Lemon Rice) दक्षिणेतील प्रसिद्ध लेमन राईस बनवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत, तुम्ही ते जेवणासाठी खाऊ शकता. कोणत्याही गोष्टीत लिंबाचा रस घातल्यास त्याची चव बदलते. त्याचप्रमाणे तुम्ही झटपट लेमन राईस बनवू शकता, ज्यामध्ये लिंबाचा रस, कढीपत्ता, हळद, लाल मिरच्या आणि मोहरी लागेल. (Special recipe of Hotel Style Lemon Rice)
लेमन राईस बनवण्याचं साहित्य
१ कप शिजवलेला तांदूळ
२ चमचे तेल
एक चिमूटभर हिंग
१ चमचा मोहोरी
१/२ कप कढीपत्ता
१ लाल मिरची
१ टीस्पून हळद
१ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून लिंबाचा रस
२ टेबलस्पून धणे
२ टेबलस्पून शेंगदाणे
१ टीस्पून उडीद
डाळ १ टीस्पून
कृती
१) कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका आणि फोडणी द्या.
२) आता त्यात हिंग, कढीपत्ता, आले, लाल मिरची, चणा डाळ आणि उडीद डाळ घाला. ते चांगले तळून घ्या.
३) दाणे तडतडायला लागल्यावर शेंगदाणे, हळद सोबत तांदूळ घाला. त्यात तांदूळ चांगले मिसळा.
४) भातामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा.
५) तयार आहे लेमन राईस. गरमा-गरम सर्व्ह करा