Join us  

रोज डाळ -भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटात करा चवदार लेमन राईस, सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:18 PM

How to make lemon rice with leftover rice : साऊथ इंडीयन स्टाईल लेमन राईस तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला बनवू शकता. हा भात बनवण्यासाठी तुम्हाला  जास्त काही करावं लागणार नाही.

रोज वरण भात चपाती भाजी खाऊनं कंटाळा आला की नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होते. पुलाव, बिर्याणी असे पदार्थ वरण भाताला ऑपश्न असले तरी ते बनवायला बराचवेळ लागतो. साहित्यही जास्त लागतं. डाळ भात नको वाटला तरी अनेकांना ताटात भात असल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही तर काहींना झोप लागत नाही. (How to make lemon rice with leftover rice)

साऊथ इंडीयन स्टाईल लेमन राईस तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला बनवू शकता. हा भात बनवण्यासाठी तुम्हाला  जास्त काही करावं लागणार नाही. फोडणीचा भात बनवताना ज्या स्टेप्स  फॉलो कराव्या  लागतात त्यात काही प्रमाणात बदल करून तुम्ही ही डीश बनवू शकता. (How to make lemon rice)

लेमन राईस कसा बनवायचा?

लेमन राईस बनवण्यासाठी सगळ्यात आधी तेलात मोहोरी तडतडू द्या.  नंतर शेंगदाणे घाला. शेंगदाणे परतवून घेतल्यानंतर एक चमचा उदीड डाळ आणि एक चमचा चणा डाळ घाला. त्यानंतर  कढईत लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, कांदे घाला. मीठ, हळद  घालून  चमच्याच्या साहाय्यानं हे साहित्य  परतवून घ्या. त्यात एक लहान भरून वाटी लिंबाचा रस घाला. नंतर मोकळा शिजवून घेतलेला भात या फोडणीत घालून एकजीव करा. त्यावरून कोथिंबीर घाला. तयार आहे गरमागरम लेमन राईस.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न