Lokmat Sakhi >Food > एका मिनिटांत लिंबू सरबत करण्यासाठी घ्या खास युक्ती, करुन ठेवा लिंबू सरबत प्री-मिक्स....

एका मिनिटांत लिंबू सरबत करण्यासाठी घ्या खास युक्ती, करुन ठेवा लिंबू सरबत प्री-मिक्स....

How To Make Lemon Squash At Home Without Preservatives : Easy Homemade Recipe : लिंबू पिळा, साखर ढवळा हे सारे टाळून झटपट लिंबू सरबत बनवण्याची खास युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 12:38 PM2023-03-13T12:38:09+5:302023-03-13T12:48:34+5:30

How To Make Lemon Squash At Home Without Preservatives : Easy Homemade Recipe : लिंबू पिळा, साखर ढवळा हे सारे टाळून झटपट लिंबू सरबत बनवण्याची खास युक्ती

How To Make Lemon Squash At Home Without Preservatives, Easy Homemade Recipe | एका मिनिटांत लिंबू सरबत करण्यासाठी घ्या खास युक्ती, करुन ठेवा लिंबू सरबत प्री-मिक्स....

एका मिनिटांत लिंबू सरबत करण्यासाठी घ्या खास युक्ती, करुन ठेवा लिंबू सरबत प्री-मिक्स....

उन्हाळ्यांत लिंबू सरबत पिणे हे एक समीकरणच तयार झाले आहे. उन्हाळ्यांत उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण लिंबू सरबत, शहाळाचे पाणी, फळांचे रस अशा अनेक पदार्थांचे सेवन करतो. उन्हाळ्यांत डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. लिंबू पाणी उन्हाळ्यातील त्रासांवर रामबाण उपाय आहे. लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे असतात. उन्हाळ्यात लिंबू पाणी घेतल्याने ताजेतवाने राहण्यास मदत होते. लिंबूपाण्यामधील गुणधर्म आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ऊन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी उपाय करत असतो. उष्माघात टाळायचा असेल तर ऊन्हाळ्यात डिहायड्रेशन होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. लिंबूपाण्याने आपल्याला ऐन ऊन्हाळ्यांत शरीराला थंडावा मिळून फ्रेश राहता येते. ऊन्हाळ्यात चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिण्याचे अनेक चांगले फायदे होऊ शकतात.

उन्हाळ्यांत आपण बहुतेकवेळा लिंबू सरबत बनवतो. प्रत्येकवेळी लिंबू सरबत बनवताना आपल्याला लिंबू पिळून त्याचा रस काढावा लागतो. यात फार वेळ जातो. तसेच बहुतेकदा घाईगडबडीच्यावेळी आपल्याकडे लिंबू पिळून त्याचा रस करण्याइतपत वेळ नसतो. अशावेळी आपण लिंबू सरबताचे प्रिमिक्स तयार करुन, त्यापासून झटपट लिंबू सरबत पाहिजे तेव्हा तयार करु शकतो. उन्हाळ्यांत बाहेरुन आल्यावर झटपट लिंबू सरबत तयार करण्यासाठी, जास्त काळ टिकणारे लिंबू सरबताचे प्रिमिक्स बनवा घरच्या घरीच(How To Make Lemon Squash At Home Without Preservatives : Easy Homemade Recipe).   

साहित्य :- 

१. साखर - ३ कप
२. पाणी - दिड कप 
३. लिंबाचा रस - १ कप
४. काळं मीठ - १ टेबलस्पून  
५. साधे मीठ - १ टेबलस्पून

कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात ३ कप साखर ओतून घ्यावी त्यानंतर त्यात दिड कप पाणी घालावे. हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर ठेवून संपूर्ण साखर विरघळत नाही तोपर्यंत हलकेच चमच्याने ढवळत राहावे. 

२. आता १० ते १५ मिनिटांनंतर साखर संपूर्ण विरघळल्यावर हे मिश्रण हातांना थोडेसे चिकट लागेल. 

३. हे मिश्रण हाताला थोडेसे चिकट लागल्यानंतर त्यात लिंबाचा रस घालावा. 

४. आता त्यात काळं मीठ व साधे मीठ घालून घ्यावे. 

५. त्यानंतर हे तयार झालेल मिश्रण एका गाळणीच्या मदतीने व्यवस्थित गाळून घ्यावे. 

६. आता हे लिंबू सरबताचे प्रीमिक्स एका काचेच्या बाटलीत भरुन रेफ्रिजरेट करावे. 

लिंबाचा रस फ्रिजमध्ये कसा साठवून ठेवायचा? पाहा सोपी ट्रिक, उन्हाळ्यात लिंबू महाग झाले तरी नो टेंशन...

प्रिमिक्स वापरुन लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी :- 

१. एका ग्लासमध्ये १ ते २ चमचे लिंबू सरबताचे तयार करुन घेतलेले प्रिमिक्स घालावे. 

२. आता आपल्या आवडीनुसार त्यात भिजवलेला सब्जा घालावा. 

३. त्यानंतर १ ग्लास पाणी ओतावे. 

४. यात आपण आपल्या आवडीनुसार पुदिन्याची पाने देखील घालून शकतो.

लिंबू सरबताचे हे तयार प्रीमिक्स एका काचेच्या हवाबंद बाटलीत भरुन रेफ्रिजरेट केल्यास पुढील ३ महिने खूप चांगले टिकते.

Web Title: How To Make Lemon Squash At Home Without Preservatives, Easy Homemade Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.